Sunday, October 19, 2025
Home अन्य प्रसिद्धी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी प्रथमच शेअर केला आईसोबतचा फोटो; चाहत्यांनी व्यक्त केले प्रेम

प्रसिद्धी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी प्रथमच शेअर केला आईसोबतचा फोटो; चाहत्यांनी व्यक्त केले प्रेम

सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कलाकारांपैकीच एक आहेत, अभिनेत्री अश्विनी भावे. ९०च्या दशकात केवळ मराठीच नव्हे, तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. अतिशय मोजक्याच पण दमदार अशा भूमिका साकारत अश्विनी यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. आता त्या चित्रपटात इतक्या सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र बऱ्यापैकी सक्रिय असतात.

अलीकडेच अश्विनी भावे यांनी त्यांच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अश्विनी यांनी प्रथमच आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे, यामुळे चाहत्यांकडून या फोटोला विशेष प्रेम आणि प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या फोटोला हजारोच्या संख्येने लाईक्स देखील मिळाले आहेत.

काही वर्षांपूर्वी अश्विनी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह विवाहबंधनात अडकल्या आहेत. लग्नानंतर त्या पतीसोबत अमेरिकेतच स्थायिक झाल्या. सोशल मीडियावर त्या त्यांच्या पती आणि कुटूंबासोबतचेही फोटो शेअर करतात. तसेच त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे, ज्यांचेही फोटो तुम्हाला अभिनेत्रीच्या अकाऊंटवर पाहायला मिळतील. एकंदरीत असे दिसून येते की, अश्विनी आता त्यांच्या कौटुंबिक जीवनात चांगल्याच रमल्या आहेत.

अश्विनी भावे यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ‘शाबास सुनबाई’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’, ‘एक रात्र मंतरलेली’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ‘हिना’, ‘सैनिक’, ‘बंधन’ या चित्रपटांमध्ये त्या दिसल्या आहेत. शिवाय अश्विनी यांनी काही कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे.

 

हे देखील वाचा