मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या आजीचे 7 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाले. अश्विनीने स्वतः सोशल मीडियावरून ही बातमी दिली. अश्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आजीच्या निधनाबद्दल सांगितले. अश्विनीच्या आजीच्या निधनाने संपूर्ण महांगडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अश्विनीच्या चाहत्यांनी देखील तिच्या दु:खात सहभागी होऊन तिच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
पोस्ट शेअर करताना अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) लिहिले की, “आजी…फक्त प्रेमाचा साठा. पण भारी शिस्तीची. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. एक काळ असा होता जेव्हा प्रचंड हाल सोसले पण कल्पतरू सारखी खंबीर उभी राहिली. माझे आणि बाबांचे किती कौतुक.पाहुणे म्हणायची ती बाबांना कारण जावयाचे नाव घ्यायचे नसते. आम्हा सगळ्यांची चिंता फक्त तिलाच.
विजय सावंत मशाल दौडला आला तर दहा वेळा मला फोन केला त्याची काळजी घे, तुम्ही नीट या….रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांसाठी जेवणाची सोय नानांनी केली ती आजीच्या घरी. आजी, मामा, मामी, विजय, अक्षय सगळेच कामाला लागले. एखादी जबाबदारी पार पाडताना सगळ्यांना अगदी प्रेम द्यायची. तिचे प्रेम, तिची माया, घरात शिरल्या शिरल्या तिने घेतलेली पप्पी सगळेच आता परत अनुभवता नाही येणार… माझी आजी” अशी भली मोठी पोस्ट तिने शेअर केली आहे.
View this post on Instagram
अश्विनी महांगडेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अश्विनी महांगडे सध्या झी मराठीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा हे पात्र साकारत आहे. ही मालिका तिच्यासाठी खूप खास आहे. तिने या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. (Actress Ashwini Mahangade grandmother passed away)
आधिक वाचा-
–‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा; जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही
–जान्हवी कपूरच्या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर जलवा, एकदा पहाच