Monday, July 1, 2024

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर आढळल्या जखमा

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाग्यश्री मोटेच्या बहिनीचे नाव मधू मार्कंडेय असे हाेते. मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे या घटने प्रकरणी वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाकड पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीची बहिण मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचं काम करायची. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने ती आणि तिची मैत्रीण रविवारी (दि. 12 मार्च)राेजी भाड्याने दुकान बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथे अचानक मधूला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे मैत्रीणीने तातडीनं खासगी रुग्णालयात मधूला दाखल केले, पण तिथुन मधूला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

मात्र, तिथे गेल्यानंतर मधूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या सर्व प्रकरणावर मधूच्या कुटुंबानी तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. असे असले तरी वाकड पोलिसांनी तिच्या शरीरावर काेणतेही गंभीर दुखापत नाही. असं सांगितलं असून अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे. या घटने प्रकरणी पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

मधूच्या मामे भावाने तिचा घातपात झाला असल्याचे शंका वर्तवली आहे. ताे म्हणाला, “पंधरा दिवसांपूर्वी मधूच्या पतीचं निधन झाल असून ती दाेन मुलांसह पिंपरीतील राहाटणीत राहत होती. मधूसाेबत गेलेली मैत्रीण आम्हा काेणाला माहीत नाही. म्हणून आम्हाला तिच्या मृत्यूविषयी संशय आहे.” असे त्याचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

मधू ही अभिनेत्री भाग्यश्री मोटे ची बहीण आहे. भाग्यश्री ने ‘देवा श्री गणेशा’, ‘देवयानी’ यासारख्या दमदार मालिकेत आपल्या अभिनयाची छाप पाडली.(actress bhagyashree mote s sister madhu markandeya death)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटर्ससोबत लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रींनी ठोकला अभिनयाला रामराम

दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

हे देखील वाचा