Friday, July 5, 2024

कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘तेरे नाम’ फेम अभिनेत्री आली पुढे; लघु उद्योगांना देणार मोफत प्रोत्साहन

देशात पुन्हा एका कोरोना विषाणूने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. यातच सर्वजण या संकटातून देशाला कसे बाहेर काढता येईल याचा विचार करत आहेत. अनेकजण पुढे येऊन सर्वांना मदत करत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार, खेळाडू आणि अनेक दिग्गज व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहे. यातच बॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावला हिने लोकांना साथ देण्यासाठी एक नवीन पर्याय शोधला आहे. ही माहिती तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून दिली आहे.

भूमिका चावलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून सांगितले आहे की, ती लघु उद्योगांना मोफत प्रोत्साहन देणार आहे. यामधून ती गरजू व्यक्तींना मदत करणार आहे. या सोबतच तिने लोकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. तिची हो पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण तिला कमेंट करून तिच्या या कामाचे कौतुक करत आहेत.

भूमिकाने पोस्ट केली आहे की, “हे नेहमीच पैशाबद्दल नाहीये. जर अशा वेळी आपण सगळे एकत्र आहोत तर आपल्याला हा विचार केला पाहिजे की, आपण इतरांना काय मदत करू शकतो. आपण स्वतःहून हा विचार केला पाहिजे की, आपण काय चांगलं करू शकतो. अनेकजण छोट्या व्यवसायिकांना मदत करत आहेत. हा मदत करण्याचा एक मार्ग आहे. जो केवळ पैशांसाठी नाहीये.”

भूमिकाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले आहे. आजही तिला सलमान खानची हिरोईन म्हणून ओळखतात. कारण तिने सलमान खान सोबत ‘तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या चित्रपटात ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत होती. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानंतर तिने ‘रन’, ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘सिलसिला’ आणि ‘दिल जो भी कहे‌’ या चित्रपटांत काम केले आहे. तसेच तिने सुशांत सिंग राजपूतच्या‌ ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटात तिने सलमान खानच्या बहिणीचे पात्र निभावले होते.

भूमिका आता बॉलिवूड सोडून साऊथ चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तिथे तिने खूप नाव कमावले आहे. तिने जाहिरातींमध्ये काम करून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या नंतर ती टीव्हीवरील ‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

हे देखील वाचा