बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पती अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत ती लाइफ एन्जॉय करत आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवर यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. करण सिंग ग्रोव्हरचे हे तिसरे लग्न आहे. तर बिपाशाचे हे पहिले लग्न आहे. अशा परिस्थितीत, करणसोबत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबियांना पटवणे अभिनेत्रीसाठी खूप कठीण होते. याचा खुलासा खुद्द बिपाशाने केला आहे.
बिपाशाने (Bipasha Basu) माध्यमांशी साधलेल्या संवादात तिने आपल्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच काही सांगितले. बिपाशाने सांगितले की, करणची दोन लग्ने तुटल्यामुळे तिला तिच्या कुटुंबाला करण सिंग ग्रोवरसोबत लग्न करण्यासाठी पटवून देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे ते लग्नाला विरोध करत होते.
बिपाशा म्हणाली की, “एखाद्याचे लग्न तुटल्याने ती व्यक्ती चुकीची असल्याचे सिद्ध होत नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्याचे लग्न मोडले, तर आपण त्या व्यक्तीवर टीका करू नये. करणच्या तुटलेल्या लग्नांपेक्षा माझे दुसऱ्याशी असलेले नाते जास्त लांब असल्याचे मी माझ्या पालकांना समजावून सांगितले. मी माझ्या नात्यात फक्त कागदावर सही केली नाही. मग मी करणपासून वेगळ कसं होऊ शकते.”
बिपाशा बसूने देखील सांगितले की, जेव्हा नातेसंबंध संपुष्टात येतात तेव्हा कधी कधी हृदय तुटते, परंतु कालांतराने गोष्टी चांगल्या होतात. बिपाशा म्हणाली की, “नाते चालत नाहीत, हे दुर्दैवी आहे. पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्ही नेहमी आनंदी असता. तुमच्या आयुष्यात गोष्टी काही कारणास्तव घडतात असे नेहमी म्हटले जाते आणि ते नेहमीच खरे असते.”
याशिवाय बिपाशाने तिच्या आयुष्याबद्दल खूप काही सांगितले. बिपाशा बसूने २००१ मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे २०१५ मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली, त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले.
हेही वाचा