बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या जोरदार चर्चेत आहे. बिपाशा ही प्रेग्नंट असून ती लवकरच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे. बिपाशा प्रेग्नंट असल्याची बातमी शुक्रवारी (दि. २९ जुलै) सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे, मागील काही काळापासून बिपाशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसली नाहीये. याव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही तिचे पूर्ण फोटो शेअर करत नाहीये. यामुळेच तिच्या प्रेग्नंसीच्या अफवा वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र, यावर अद्याप अभिनेत्री बिपाशाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. अशातच तिने एक पती करण सिंग ग्रोव्हर यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने पतीची प्रशंसा केली आहे.
काय आहे बिपाशाची पोस्ट?
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) हिने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती तिची फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. बिपाशाने फोटो शेअर करत लिहिले आहे की, “पतीच्या प्रशंसेखातर पोस्ट.” यासोबतच तिने स्टिकरही शेअर केले आहे. त्यावर ‘१०० टक्के हॉट,’ असे लिहिण्यात आले आहे.
लवकरच करणार घोषणा
खरं तर, या जोडप्याबाबत बोलले जात आहे की, लवकरच हे जोडपे आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करू शकतात. त्यांचे चाहते या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बिपाशा आणि करणचे लग्न
बिपाशा आणि करण (Bipasha And Karan Marriage) यांच्याबाबत बोलायचं झालं, तर ते दोघेही सन २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘अलोन’ या सिनेमाच्या सेटवर भेटले होते. दोघांमध्ये कोणालाही पहिल्या नजरेचं प्रेम झालं नव्हतं. दोघांनीही काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर सन २०१६ मध्ये दोघांनीही लग्न केले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भोजपुरी स्टारवर भारी पडला आकांक्षा दुबेचा ठुमका, पाहणारे पाहतच राहिले
सलमान खानच्या जीवाला धोका? गन लायसन आणि आता बुलेटप्रूफ गाडीची व्यवस्था
अजय देवगणसमोरच डायरेक्टरने केलेला सैफचा बाजार, एका चापटीत चारलेली धूळ