Saturday, June 29, 2024

लग्नाच्या 6 वर्षांनंतर गरोदर झालेल्या बिपाशाने शेअर केला व्हिडिओ, एक्सप्रेशन्स देत दाखवला बेबी बंप

अभिनेत्री बिपाशा बासू ही सध्या तिच्या प्रेग्नंसीचा आनंद लुटत आहे. तिच्यासोबतच तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर हा देखील बापमाणूस बनण्यासाठी खूपच उत्सुक आहे. अशा स्थितीतही बिपाशा तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अशात तिने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत बिपाशा तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे.

बिपाशा बासू (Bipasha Basu) हिने शेअर केलेल्या व्हिडिओत ती हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. यामध्ये ती सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे, नेहमीच मेकअपमध्ये दिसणारी बिपाशा या व्हिडिओत मेकअपशिवाय दिसत नाही. व्हिडिओत दिसते की, ती एका बेडवर विश्रांती करत आहे.

बिपाशाच्या या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘मोमेंट्स लाईक्स दिस’ हे गाणे वाजत आहे. या व्हिडिओत ती बेबी बंप फ्लॉन्ट करत एक्सप्रेशन्सही देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने हार्ट इमोजीसह ‘मम्मा टू बेबी’, ‘लव्ह योरसेल्फ’, ‘लव्ह योर बॉडी’, ‘ग्रेटफुल’ आणि ‘ब्लेस्ड’ यांसारख्या हॅशटॅग्जचा वापर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांसोबतच कलाकारही कमेंट करत आहेत. ‘बिग बॉस’ फेम आरती सिंग हिने कमेंट केली की, “बाळ येत आहे. जय माता दी.” यानंतर बिपाशानेही कमेंटमध्ये “जय माता दी” असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

तब्बल 6 वर्षांनी बनणार आई
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट 2015 साली ‘अलोन’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. येथेच त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 साली लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे, लग्नाच्या 6 वर्षांनंतर बिपाशा आता आई बनणार आहे. तिच्यासाठी ही आनंदाची बाब आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
मलायका आणि अरबाजच्या लग्नात अर्जुन कपूर होता १३ वर्षाचा, फोटो पाहिला का?
‘आता बॉयकॉट करु नका…’ व्हायरल व्हिडिओमुळे नेटकरी झाले ऋतिक रोशनवर फिदा
अटक वॉरंट आल्यानंतर सपना चौधरीचा व्हिडिओ व्हायरल; म्हणतेय, ‘आम्ही खानदानी गरीब…’

हे देखील वाचा