‘अदालत’, ‘नागिन’ आणि ‘एक चुटकी आसमान’ यांसारख्या दमदार मालिकेमध्ये काम करणाऱ्या छवी मित्तल काही काळापासून ब्रेस्ट कॅंसरमुळे चर्चेत आहे. ती सोशल मीडियावरही भरपूर सक्रिय असते. तिने पती मोहित हुसेन याच्यासाेबत 42वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचे फाेटाे देखील अभिनेत्रीने साेशल मीडियावर शेअर केले, परंतु याच कारणांमुळे ती फार ट्राेल झाली. इतकंच नाही, तर तिला ‘डबल स्टँडर्ड’ देखील म्हणण्यात आले. अशातच अभिनेत्रीने ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ट्रोलर्सनी केलेल्या कमेंट्सची झलक आणि तिचा पती मोहितसोबतचे फोटो शेअर केले आहेत. एका फाेटाेमध्ये ती आपल्या पतीसाेबत लिपलॉक करताना दिसली. हा फाेटाे शेअर करत छवी मित्तलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही माझ्यासमोर तुमची मते मांडता, तेव्हा मला तुमचे खरोखर कौतुक वाटते. मी दिलेला मजबूत संदेश, ती ताकद, लवचीकता, लढण्याची भावना आणि जगण्याबद्दल आणि जगू देण्याबद्दल होते. संदेशाने तुम्हाला प्रेरित केले, परंतु फाेटाेने तुम्हाला ‘डबल स्टँडर्ड’ दाखवले. जाेपर्यंत डिप्रेशनचा प्रश्न आहे, तर मला वाटतं तुम्ही कॅप्शन नीट वाचले नाही.”
View this post on Instagram
छवी मित्तलने पुढे लिहिले की, “जाेपर्यंत माझ्या पतीला किस करायचा प्रश्न आहे, तर हा एक वैयक्तिक क्षण आहे. मी त्यांच्याबराेबर गेल्या 18 वर्षांपासून साेबत आहे. एक क्षण शेअर करत आहे. आता तुम्ही ठरवणार का, की सेलिब्रिटींनी काय करायला हवं आणि काय नाही. राहुदे भावा. जेव्हा मी माझ्या ब्रेस्टविषयी सांगितले, तेव्हा लाेक टाळ्या वाजवत हाेते. बऱ्याच लाेकांसाठी, कर्करोगाची केवळ शक्यता लोकांना रडवते आणि निराश करते, परंतु मी माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि उत्कृष्ट सकारात्मक वृत्तीने ही लढाई लढली आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही माझे स्तन पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की ते योद्धा आहे.”
अभिनेत्री छवी मित्तल हिची ही पोस्ट जोरदार चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
पतीचा फोन सतत लागत होता बिझी; भडकलेली कॅटरिना थेट म्हणाली, ‘कुणाशी बोलत होता रे? तुझ्यामुळे…’
‘माझ्या वडिलांच्या जीवाला धोका, रितेश-अभिषेक मदत करा’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे ट्वीट व्हायरल
बाबो! पोटात बुक्क्या मारत राहिला व्यक्ती, सहन न झाल्याने अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल