Tuesday, July 9, 2024

Birthday | सौंदर्याने घायाळ करणारी चित्रांगदा सिंग आहे एका मुलाची आई, चित्रपटात येण्यापूर्वीच केलंय तिने लग्न

अल्ताफ राजा (Altaf Raja) यांच्या ‘तुम तो ठहरे परदेसी’ या अल्बममधून अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या नजरेत आली. तर, ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रदीर्घ फिल्मी कारकीर्द असूनही चित्रांगदाला अभिनयात अपेक्षित प्रसिद्धी मिळवता आली नाही. त्यानंतर तिने चित्रपट निर्मितीत हात आजमावला. चित्रांगदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट फोटो शेअर करत असते. चित्रांगदा सिंग तिचा बुधवारी (30ऑगस्ट) वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी संबंधित काही किस्से जाणून घेऊया.

राजस्थानमधील जोधपूर येथे 30 ऑगस्ट 1976 रोजी जन्मली. चित्रांगदा सिंग ही आर्मी ऑफिसरची मुलगी आहे आणि तिचा भाऊ दिग्विजय सिंग गोल्फर आहे. अभिनेत्रीने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून होम सायन्समध्ये पदवी घेतली आहे. चित्रांगदाने कॉलेजच्या दिवसांपासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्यादरम्यान तिला अनेक मोठ्या जाहिराती मिळाल्या.

चित्रांगदाने 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधावासोबत लग्न केले. तिला या नात्यातून एक मुलगाही आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांच्या विभक्त झाल्यानंतर अनेक प्रकारच्या अफवाही उठल्या होत्या.

माध्यमांतील वृत्तानुसार, चित्रांगदाच्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या निर्णयामुळे तिच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आणि या मतभेदाचे रूपांतर घटस्फोटात झाले. चित्रांगदाला एक मुलगाही आहे, ज्याची कस्टडी अभिनेत्रीला मिळाली आहे. चित्रांगदा तिचा मुलगा जोरावरसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती आणि तिने तिच्या मुलासोबत दिल्लीत राहावे अशी रंधावाची इच्छा होती. चित्रांगदाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि दोघांनाही ते मान्य नव्हते.

चित्रांगदाने जेव्हा सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वैसे ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रांगदाने आतापर्यंत ‘देसी बॉईज’, ‘इंकार’ आणि ‘ये साली जिंदगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा –
सुरुवातच दणक्यात! प्रिया बापट-उमेशच्या नाटकाचा मुंबई, पुण्यात धुमाकूळ; ‘जर तर ची गोष्ट’ हाऊसफुल्ल
कॉलेजच्या रॅगिंगने बदलले चित्रांगदा सिंगचे आयुष्य, ‘अशी’ मिळाली पहिली ऑफर

हे देखील वाचा