Wednesday, June 25, 2025
Home मराठी ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह; म्हणाली, ‘हा अनुभव एकदम…’

‘या’ मराठी चित्रपटात झळकणार बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह; म्हणाली, ‘हा अनुभव एकदम…’

‘दगळी चाळ २’ हा चित्रपट येणार असल्याचं समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे प्रेक्षकांसमोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. ‘राघू पिंजऱ्यात आला’ असे या गाण्याचे बोल असून डेझी शाह (Daisy Shah) या बॉलिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हीचा आवाज लाभला आहे. तर अवघ्या बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

‘जय हो’ आणि ‘हेट स्टोरी ३’ अशा गाजलेल्या चित्रपटामध्ये झळकलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह (Daisy Shah)’रघु पिंजरियात आला’ या मराठी गाण्यात दिसणार आहे.’दगडी चाळ २’ या बहुप्रतिक्षित लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपटाचा आउट-अँड-आउट देसी नंबर एक भाग आहे. या गाण्याबद्दल डेझी शाह म्हणाली की, “मला नेहमीच डान्सची आवड आहे आणि हा डान्स नंबर पूर्णपणे वेगळा अनुभव होता. सेटवर प्रचंड जल्लोष होता.” डेझी शाह म्हणाली की, ‘मला नेहमीच नृत्याची आवड आहे आणि हा डान्स नंबर पूर्णपणे वेगळा अनुभव होता. सेटवर प्रचंड जल्लोष होता. जेव्हा डान्स नंबर येतो, तेव्हा मी अनेक अभिनेत्रींकडे पाहते. अशा अप्रतिम गाण्याला मी न्याय देऊ शकली याचा मला आनंद आहे.”

डान्स नंबरसाठी डेझीची पहिली पसंती होती
निर्मात्या संगीतकार अहिर म्हणतात, “जेव्हा या गाण्याचा आम्ही या चित्रपटात समावेश करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वात आधी माझ्यासमोर डेझी शाहचा चेहरा आला. याबाबत आम्ही तिला विचारणा केली आणि तिनेही त्वरित होकार दिला. हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीने मराठी पडद्यावर काम करायला इतक्या लगेच होकार देणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गाण्याची टीमच इतकी अफलातून आहे की, हे गाणे, डेझीचे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.”

 

View this post on Instagram

 

‘दगडी चाळ २’ मध्ये अंकुश चौधरी दिसणार आहे. यात मकरंद देशपांडेही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे. डेजी शाहबद्दल सांगायचे तर ती हेट स्टोरी ३, जय हो, रेस ३ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. डेझी शाह चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कोरिओग्राफर होती. या नवीन गाण्यासाठी सलमान खानने डेझी शाहला शुभेच्छा देताना त्याचा व्हिडिओही त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

कॉमेडियन राजू श्रीवास्तव हेल्थ अपडेट I पत्नी, मुले मुंबईहून दिल्लीला रवाना

मुलगा तैमूरच्या प्रसिद्धीवर खूप काही बोलली करीना; म्हणाली, ‘प्रत्येकाला तो स्टार वाटतो, पण तो तर…’

कोण आहे फरमानी नाज? ‘हर घर तिरंगा’ गाण्याने होतेय सर्वत्र चर्चा

हे देखील वाचा