बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानचा ‘नो एन्ट्री’ हा कॉमेडी सिनेमा कमालीचा सुपरहिट ठरला होता. मागील काही दिवसांपासून या सिनेमाच्या सिक्वलबदल खूप चर्चा रंगल्या आहेत. कधी या सिनेमाचे शूट चालू झाले आहे, अशी बातमी येते, तर कधी या सिनेमाचे काम पूर्णपणे थांबले आहे, अशी माहिती समोर येते.
मात्र, आता या सिनेमाच्या पुढच्या भागाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. हा सिनेमा बनावा म्हणून निर्मात्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. या सिनेमात अभिनेत्री डेझी शाह (Daisy Shah) पुन्हा एकदा सलमानबरोबर दिसणार असल्याची चर्चा आहे. खरं तर याआधी डेझी २०१४मध्ये ‘जय हो’ आणि २०१८ मध्ये ‘रेस ३’ मध्ये सलमानबरोबर दिसली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अनीस बज्मी (Anees Bazmee) यांनी सलमानला (Salman Khan) त्याच्या ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ (No Entry Mein Entry) या सिनेमासाठी साईन केले आहे. हा सिनेमा ‘नो एन्ट्री’चा सिक्वल असेल आणि लवकरच ते या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करणार आहे. या चित्रपटाबाबत अनेक रंजक माहिती समोर येत आहे. यामध्ये सलमान तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान व्यतिरिक्त, या चित्रपटातील इतर कलाकार, अनिल कपूर आणि फरदीन खान देखील तिहेरी भूमिका करताना दिसणार आहेत आणि या सर्व ९ पात्रांसाठी वेगवेगळ्या अभिनेत्रींना कास्ट करण्याची तयारी सुरू आहे.
सिनेमात दिसणार ९ वेगवेगळ्या अभिनेत्री
असे म्हटले जात आहे की, त्या ९ अभिनेत्रींमध्ये डेझी शाहचा देखील समावेश आहे. डेझीबद्दल बोलायचं झालं, तर ती याआधी ‘जय हो’ आणि ‘रेस-३’ मध्ये सलमानबरोबर दिसली होती. ‘नो एन्ट्री’च्या सिक्वलची चर्चा ही गेल्या ६वर्षांपासून चालली होती. या सिनेमाची स्क्रिप्ट आता पूर्ण झाली आहे आणि लवकरच शूटिंग चालू होईल.
२००५ मध्ये आलेला ‘नो एन्ट्री’ हा सिनेमा चांगलाच गाजला
मुकेश छाबरा या सिनेमाच्या कास्टिंगची जबाबदारी निभावत आहेत. सिनेमातील उर्वरित अभिनेत्रींची निवड ते करणार आहेत. २००५ साली ‘नो एन्ट्री’ हा पती-पत्नीच्या नात्यावर आधारित सिनेमा प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये पती पत्नीला धोका देत बाहेरच्या मुलींसोबत मजा करतात. या चित्रपटाची कथाही तीच असेल, पण यावेळी हे स्टार्स तीन वेगवेगळ्या भूमिका करताना दिसणार आहेत. अनीस बज्मी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून ते या सिनेमाचे दिग्दर्शनही करणार आहेत. या सिनेमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
हेही वाचा-