Saturday, June 29, 2024

‘खूपच वेदनादायक होते ते सेक्स सीन्स’, म्हणत अभिनेत्री डकोटा जॉनसनने सांगितली शूटिंगची धक्कादायक कहाणी

‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ हा हॉलिवूड सिनेमा कदाचित सर्वांनी पाहिला असेल. सन २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधले होते. यामधील अभिनेत्रीवर चाहत्यांनी जीव ओवाळून टाकला होता. ती अभिनेत्री म्हणजे डकोटा जॉनसन होय. जॉनसन ही सन १९९९पासून हॉलिवूड सिनेमात काम करत आहे. मात्र, तिला ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ या सिनेमातून चांगली प्रसिद्धी मिळाली. या सिनेमात तिने गोड आणि साधी- भोळी मुलगी अनास्ताशिया हिची भूमिका साकारली होती, जी हिंसक लैंगिक उत्साही अब्जाधीश ख्रिस्टियन ग्रेसोबत रिलेशनशिपमध्ये येते. ग्रे ही भूमिका जेमी डोर्नन याने साकारली होती.

‘खूप वेदनादायक असायचे सेक्स सीन’
या सिनेमात खूपच हॉट, बोल्ड आणि इंटीमेट सीन्सचा दाखवण्यात आले होते. यातील सेक्स सीनबद्दल अभिनेत्री डकोटा जॉनसन (Dakota Johnson) हिने यापूर्वीही वक्तव्य केले आहे. असेच काहीसे पुन्हा एकदा तिने सांगितले होते की, कशाप्रकारे जेमी डोर्नन (Jamie Dornan) याच्यासोबत या सीन्सची शूटिंग करताना किती वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. सन २०१५मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत डकोटा जॉनसनने ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’मधील एका सेक्स सीनबद्दल चर्चा केली होती. यामध्ये जेमी तिला बेडवर फेकून देतो. या सीनची आठवण काढत ती म्हणाली होती की, “मला बेडवर फेकल्यानंतर जेमीने मला चाबकाने मारले, हे खूपच वेदनादायक होते. आमच्याकडे या सर्व सीन्सच्या रील असायला पाहिजे होत्या.”

तिने पुढे बोलताना सांगितले होते की, या सीनसाठी तब्बल १७ वेळा रिटेक घेण्यात आले होते. त्यामुळे पूर्ण दिवसभर तिचे डोके आपटले गेले आणि शेवटी तिला तिची मानही हलवता येत नव्हती.

सेक्स सीन्समुळे तणावग्रस्त झाले होते वातावरण
या सिनेमातील आणखी एका सीनची आठवण काढत डकोटा जॉनसन म्हणाली की, “एकदा आम्ही किचनमध्ये एका सीनची शूटिंग करत होतो आणि मला कॅबिनेटमध्ये लपायचे होते. मी तो हँडल ओढला, पण तो खरोखरचा कॅबिनेट नव्हता आणि पूर्ण सेटच माझ्यावर कोसळला होता.” अभिनेत्री म्हणाली की, सेक्स सीनमुळे सेटवरील वातावरण खूपच तणावग्रस्त व्हायचे. तिच्या दुखापतींमुळे हे टेन्शन जरा कमी व्हायचे. डकोटा पुढे बोलताना म्हणाली की, “अनेकदा मी थोडीशी शॉक व्हायचे आणि सेट्सवरून बाहेर जायचे. घरी गाडी चालवत जाण्यामुळे आणि रात्री एक ग्लास वाईनमुळे हा त्रास कमी व्हायचा.”

सिनेमाचे २ भाग झाले होते प्रदर्शित
डकोटा जॉनसन हिने ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ सिनेमाच्या २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ आणि २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’मध्येही अनास्ताशिया स्टील हे पात्र साकारले होते. पहिल्या सिनेमात ग्रे आणि अनाची भेट आणि त्यांच्यात लैंगिक संबंध होतात. दुसऱ्या सिनेमात दोघांमध्ये पुन्हा रोमान्स निर्माण होतो. त्यानंतर तिसऱ्या सिनेमात दोघांचे लग्न होते आणि त्यांचे कुटुंब वाढत जाते.

डकोटा जॉनसन हिच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रेझी इन अल्बामा’ या सिनेमातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने २०१०मध्ये आलेल्या ‘द सोशल नेटवर्क’ सिनेमात काम केले. या सिनेमाने बक्कळ कमाई केली होती. पुढे ती २० हून अधिक सिनेमात झळकली. आता तिच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये ‘पर्सुएशन’ सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

फक्त ‘सीरियल किसर’च नाही, तर जबरदस्त बॉडी बिल्डरही आहे इमरान हाश्मी; एकदा व्हिडिओ पाहाच

बाबो! ऐन पावसाळ्यातही शहनाज गिलच्या लूकने चाहत्यांच्या मनात लावली आग, व्हिडिओ व्हायरल

‘आता मी कपडेच घालणार नाही’ कॅमेरामनच्या ‘त्या’ मागणीवरुन संतापलेल्या उर्फी जावेदने स्पष्टच सांगितले

हे देखील वाचा