×

‘फायटर’मध्ये ऋतिक रोशनसोबत काम करण्यास दीपिका पदुकोण आहे उत्सुक, म्हणाली ‘एकत्र काम करण्याची…’

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. आता तिच्या बहुप्रतिक्षित ‘फायटर’ या चित्रपटाबद्दल तिची प्रतिक्रिया देताना तिने म्हटले आहे की, तिला ऋतिकसोबत काम करण्याची नेहमीच इच्छा होती आणि ती या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा तिला ऋतिकसोबत काम करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “मला नेहमीच ऋतिकसोबत काम करायचे होते. पण काहीवेळा हे फक्त एखाद्यासोबत काम करण्यापुरतेच नसते, मला वाटते की एखाद्यासोबत काम करताना बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्याची स्क्रिप्ट योग्य असावी, त्याला योग्य दिग्दर्शक असावा. याच गोष्टी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतात. होय, मला वाटतं की, एकत्र काम करण्याची हीच योग्य वेळ आहे.”

 

 ‘फायटर’ चित्रपट यावर्षी होऊ शकतो प्रदर्शित

‘फायटर’ हा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित भारतातील पहिला एरियल ऍक्शन फ्रँचायझी चित्रपट आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन, अनिल कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहेत. या ऍक्शन ड्रामा चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोण आणि ऋतिक रोशन पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. ऋतिक रोशनचा हा चित्रपट यावर्षी ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो.

या चित्रपटाद्वारे ऋतिक जवळपास ३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तो शेवटचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने मेजर कबीर लुथरा यांची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

दीपिका पदुकोण वर्कफ्रंट 

दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका शाहरुख खानसोबत अनेक धमाकेदार ऍक्शन सीन्स करताना दिसणार आहे. याशिवाय नाग अश्विनच्या फिल्म प्रोजेक्ट, ‘बैजू बावरा’, ‘द इंटर्न’, ‘गहराइया’ या चित्रपटांमध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

Latest Post