Friday, October 18, 2024
Home बॉलीवूड आई झाल्यानंतर या चित्रपटांत दिसणार दिपिका पदुकोन; बिग बजेट चित्रपटांचा सामवेश…

आई झाल्यानंतर या चित्रपटांत दिसणार दिपिका पदुकोन; बिग बजेट चित्रपटांचा सामवेश…

ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची गणना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. दीपिकाने अनेक चित्रपट केले असून आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता तिचे काही चित्रपट अशा पंक्तीमध्ये आहेत, ज्यामध्ये दीपिका एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे. 

आत्तापर्यंत दीपिकाने पद्मावत, बाजीराव मस्तानी, ये जवानी है दिवानी, गोलियों की रासलीला राम लीला यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. एका मुलीची आई झाल्यानंतर दीपिका पदुकोण लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सर्वप्रथम दीपिका या वर्षी सिंघम अगेनमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दीपिका गरोदर होती. जरी तीने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सिंघम 3 यावर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात दीपिका एका पोलिस महिलेच्या भूमिकेत दिसणार असून तिचे नाव शक्ती शेट्टी आहे.

ब्रह्मास्त्र २ मध्ये दीपिका पदुकोणचीही महत्त्वाची भूमिका आहे. ब्रह्मास्त्रापलीकडची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी ब्रह्मास्त्रचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतरच ब्रह्मास्त्र 2 आणि ब्रह्मास्त्र 3 च्या आगमनाची घोषणा केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका कल्की 2 मध्ये देखील दिसणार आहे. कल्की 2898 मधील दीपिकाचे पात्र सर्वांनाच आवडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका द इंटर्न नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा करणार आहेत. सुनील खेत्रपाल आणि दीपिका संयुक्तपणे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

असे खडतर आयुष्य जगला आहे प्रेक्षकांचा लाडका जितु भय्या; रोजंदारीवर सुताराकडे केले आहे काम, प्रसंगी जंगलात झोपडी बांधून काढले आहेत दिवस…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा