Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिमान असायला हवा! दीपिकाने फॅशन शोमध्ये आई-वडिलांसोबत पसरवले सौंदर्याचे जलवे, पाहा व्हिडिओ

बाॅलिवूड लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण  ही हिंदी सिने जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटातील दमदार अभिनयामुळे  दीपिकाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तिची एक झलक पाहायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशातच दीपिकाचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. 

सध्या सुरू असलेल्या फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोण (Deepika padukone) पॅरिसमध्ये पोहोचली आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये हॉलिवूडचे ए-लिस्टर्स जसे की, अ‍ॅलिसिया विकेंडर आणि अँटोनी अर्नॉल्ट आणि एना डी आर्मास उपस्थित असतात. यावर्षी या शोमध्ये सहभागी होण्यासोबतच ए-लिस्टर्सच्या यादीत बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणचे नावही  सामील झाले आहे.

फॅशन वीकमधून शेअर केल्या जाणाऱ्या फोटोंनी दीपिकाच्या चाहत्यांची मने, तर जिंकलीच पण तमाम भारतीयांना अभिमानही वाटत आहे. या फॅशन शोचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

फॅशन वीकमध्ये सहभागी होत असताना दीपिकाच्या चाहत्यांना या अभिनेत्रीची किलर स्टाईल पाहायला मिळाली आहे. शो दरम्यान, अभिनेत्रीने राखाडी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आणि केस माेकळे साेडून  तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.

फॅशन वीकमध्ये दीपिका पाेहचली आई-वडिलांसोबत
विशेष म्हणजे दीपिका तिच्या आई-वडिलांसोबत या शोमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीसोबत तिचे वडील प्रकाश पदुकोण आणि आई उज्जला पदुकोण देखील दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दीपिकाची आई देखील कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. पांढरा शर्ट, ट्राउझर्स आणि सूटमध्ये त्या अतिशय स्टायलिश दिसत आहेत. दुसरीकडे, तिचे वडील प्रकाश पदुकोण अतिशय क्लासी आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्यानी पांढऱ्या टी-शर्टवर काळ्या रंगाचा स्वेटर घातला आहे.

दीपिका पदुकोण लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनच्या वतीने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आली आहे. ती लुई व्हिटॉनची ब्रँड ऍम्बेसेडर आहे. अलीकडेच या अभिनेत्रीची ज्वेलरी ब्रँड ‘कार्टियर’चा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून घाेषीत करण्यात आले हाेते.

दीपिका लवकरच दिसणार पठाण चित्रपटात
दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री लवकरच ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टॅलेंट लागताे भावा! उर्फी जावेदचा आतापर्यंतचा सर्वात भारी लूक; अभिनेत्रीने परिधान केले तरी काय?
ऋतिक आणि शाहरुख सारख्या आभिनेत्यांना 80 च्या वयात टक्कर देणारे अमिताभ, लहान मुलांच्या मनावरही करतात राज्य

हे देखील वाचा