बॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये आपल्या खलनायकी भूमिकांमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री दीपशिखा नागपालबद्दल वाईट बातमी येत आहे. ‘ना उम्र की सीमा हो’ आणि ‘सत्यवती रायचंद’ आदी मालिकांमधून त्या भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून त्या सेटवर आल्या नसल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता कि त्या का नाही येत त्याचा मात्र आता त्याचा खुलासा झाला आहे. दीपशिखा यांचे मोठे ऑपरेशन झाले असून, त्या सध्या अराम करत आहे.
दीपशिखा यांनी स्वतः याबद्दल सांगितले असता त्या म्हणाल्या, “नुकतीच मी फूड पोझनिंगमुळे आजारी होती. यामुळे माझ्या पोटात खूपच दुखत होते. मी माझ्या डॉक्टरांना संपर्क केला तेव्हा त्यांनी मला काही चाचण्या करायला सांगितले कारण माझा त्रास काही कमी होत नव्हता. मी सोनोग्राफी केली आणि मग आम्हला समजले की माझ्या पोटात सिस्ट आहे. एक प्रकारची गाठ आहे. हि गाठ जवळपास गर्भातील दहा आठवड्यांच्या बाळाएवढी मोठी मोठी. डॉक्टरांनी लगेच मला ती काढण्याचा सल्ला दिला. कारण ती गंभीर होती आणि जर मी ती नसती काढली तर मला अजून त्रास झाला असता. तर माझ्या शोमध्ये मोठा ड्रामा सिक्वेन्स चालू होता. त्यामुळे माझे वेळापत्रक पूर्ण व्यस्त होते. म्हणून मी माझे काम केले आणि माझी सुट्टी आल्यावर लगेच ऑपरेशन केले.”
View this post on Instagram
पुढे दीपशिखा यांनी सांगितले की, “ऑपरेशननंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी काही काळ अराम केला आणि आता पुन्हा परत आली आहे. आत मी माझी शूटिंग पूर्ण करत असून मधेमधे अराम देखील करत आहे. माझ्या सेटवरच्या लोकांनी देखील माझी खूप काळजी घेतली. आता मी हळूहळू ठीक होत आहे. प्रत्येक कलाकारासाठी द शो मस्ट गो ऑन असे तत्व पाहिजे.”
दरम्यान दीपशिखा सध्या चित्रपटांमध्ये खूप कमी आणि टेलिव्हिजनवर जास्त काम करताना दिसत आहेत. त्या सध्या ‘ना उम्र की सीमा हो’ या शोमध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटर्ससोबत लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रींनी ठोकला अभिनयाला रामराम
दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ