मालदीवच्या निळ्याशार समुद्रावर अभिनेत्री धनश्री वर्मा करत आहे एंजॉय, व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचे केले मनोरंजन


कोरोनाच्या टाळेबंदी दरम्यान सगळेच आपल्या घरात राहीले होते. परंतु हळूहळू जसे जग पूर्व पदावर येत आहे, तसतसे सगळेजण कुठे तरी सुट्टी एंजॉय करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री धनाश्री वर्मा ही देखील आपल्या पतीसोबत मालदीवला सुटीसाठी गेली आहे. तिथे तिने बॉलिवूडमधील गाण्यावर एक व्हिडिओ बनवला आहे, आणि कोणत्याच क्षणाची प्रतीक्षा न करता तिने तो तिच्या चाहंत्यांसाठी शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये धनश्री ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे.

या व्हिडीओला शेअर करत धनश्री वर्माने असे कॅप्शन दिले आहे की,” माझ्या येणाऱ्या गाण्याबाबतीत तुम्ही माझ्या इतकेच एक्साइटेड असाल.” तिच्या या व्हिडीओला प्रेक्षक खूपच पसंती दर्शवत आहे. या व्हिडिओ आधी धनश्रीने काही फोटो देखील शेअर केले होते. ज्यामध्ये ती समुद्राच्या आत काहीतरी क्रिएटिव्ह करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये धनाश्री आणि युजवेंद्र चहल हे दोघे एकमेकांना त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

धनश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच पंजाबी सिंगर जस्सी गिल याच्या एका नवीन गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहायला गेलं तर,धनाश्री ही डॉक्टर आहे, पण तिला डान्स करायला खूपच आवडते. ती वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून, तिच्या चाहत्या मनोरंजन करत असते. मागच्याच वर्षी धनश्रीने क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्याशी लग्न केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.