अभिनेत्री दिया मिर्झाने पहिल्यांदाच तिच्या मुलाचा पूर्ण चेहरा दाखवणारा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या नवीन प्रवासाबद्दल सांगितले आहे. या फोटोत प्रथमच तिच्या मुलाचा चेहरा दिसत आहे. दियाने या अगोदर अव्यानचे काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये कधी अव्यानच्या हाताची किंवा पायाची, तर कधीकधी अव्यानच्या खोलीची झलक दाखवली होती. मात्र, आता ५ महिन्यांनंतर दियाने मुलाचा पूर्ण चेहरा दाखवला आहे. फोटोमध्ये अव्यानचा चेहरा अस्पष्ट असला तरी, या प्रतिमेवरून हे स्पष्ट आहे की, दियाप्रमाणे तिचा मुलगाही खूप क्यूट आहे.
प्री-मॅच्युअर झाला अव्यानचा जन्म
दिया आजकाल तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दियाने यावर्षी मे महिन्यात अव्यानला जन्म दिला होता. मात्र, दोन महिन्यांनंतर जुलै महिन्यात दिया मिर्झा आणि तिचा पती वैभव रेखी यांनी एका मुलाच्या जन्माची घोषणा केली. तसेच, दोघांनीही सांगितले होते की, अव्यानचा जन्म सी-सेक्शनने झाला आहे आणि तो प्री-मॅच्युअर असल्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
दिया मिर्झाने दाखवला मुलाचा चेहरा
अव्यानची पहिली झलक दाखवत दियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमची कथा आताच सुरू होत आहे अव्यान.” अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो स्केच इमेजमध्ये आहे. या फोटोमध्ये दिसून येत आहे की, दिया एका दरवाजासमोर उभी असून तिने लांब ड्रेस घातला आहे. त्याचबरोबर तिने केसही मोकळे सोडले आहेत. अव्यानला तिच्या हृदयाजवळ घेऊन तिचे प्रेम व्यक्त करत आहे. त्याच वेळी, क्यूट बाळ त्याच्या आईच्या खांद्यावर आरामात झोपलेले दिसत आहे. एका बाजूला फोटोमध्ये काही पुस्तके आणि फुलांची रोपे दिसत आहेत.
दियाच्या पोस्टवर कलाकारांनी केल्या कमेंट्स
त्याचबरोबर, दियाच्या या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. त्याचबरोबर बॉलिवूड कलाकारांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने रेड हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे, तर डायना पेंटीने अव्यानला “चॅम्पियन,” असे म्हटले आहे.
या कारणांमुळे दिया मिर्झा राहिली चर्चेत
अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. गरोदरपणाच्या शेवटच्या वेळेपर्यंत दिया तिच्या चाहत्यांशी जोडलेली होती. दियाने यावर्षी १५ फेब्रुवारी रोजी व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्न केले. लग्नाच्या सुमारे दीड महिन्यानंतर तिने तिच्या चाहत्यांना तिच्या गर्भधारणेची माहिती दिली. दिया तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी चर्चेत असायची. बऱ्याचदा ती सामाजिक विषयांवरही आपले मत उघडपणे व्यक्त करते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्मिला मातोंडकरने सांगितला गणेश उत्सवाचा अनुभव; म्हणाली, ‘आम्ही कोकणातील आमच्या घरी…’
-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना