Thursday, July 18, 2024

‘ये काली काली आंखे’ गाण्यावरील दिशा पटानीचा धमाकेदार डान्स आणि हॉट मूव्ह्ज पाहून चाहते झाले घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या चित्रपटातील अभिनयासाठी चर्चेचा विषय ठरत असते. तिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘ये काली काली आंखे’ ही वेबसिरीज चर्चेचा विषय ठरत आहे. ताहिर राज भसीन आणि श्वेता यांच्या सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोक या सीरिजवर टीका करत आहेत तर अनेक लोकं टीका देखील करत आहे. मात्र, या सीरिजचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिशाचा आकर्षक अंदाज दिसत असून, तिचा लूक देखील सर्वांना आवडत आहे.

दिशा ‘ये काली काली आंखे’च्या रिमिक्स व्हर्जनवर गुगलिंग डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओतील दिशाचा हॉटनेस पाहून चाहत्यांचे भान हरपले आहे. या व्हिडिओमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओसह नेटफ्लिक्सने सर्व प्रेक्षकांना एक आव्हानही दिले आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा ‘ये काली काली आंखे’ गाण्याच्या नवीन व्हर्जनवर स्पेशल मिक्स गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सुरू होताच दिशा तिच्या हॉटनेसने प्रेक्षकांचे मने जिंकत आहे. या व्हिडिओतील दिशाचा डान्स खूपच धमाकेदार असून, दिशाने तिच्या डान्स मूव्ह्जने चाहत्यांना वेड लावले आहे.

या व्हिडिओसोबत नेटफ्लिक्स इंडियाने कॅप्शनमध्ये सर्व प्रेक्षकांना एक आव्हानही दिले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “ही काली काली आंखे डान्स मिक्स असल्याने कोणीही शांत राहू शकत नाही आणि या गाण्यावर रील बनवायला लोक कुठे आहेत.” नेटफ्लिक्सची ही विलक्षण मालिका सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी दिग्दर्शित केली असून, हे गाणे अभिनेत्री आंचल सिंगवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातील दिशा पटानीचा डान्स पाहण्यासारखा आहे. या व्हिडिओमध्ये दिशाचा किलर लूक आणि तिचा सिझलिंग अवतार पाहण्यासारखा आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा