हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असतात. या अभिनेत्रींमध्ये आवर्जुन नाव घ्यावं अशी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी होय. दिशा नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वैयक्तिक आणि व्यावसायिक फोटो शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. अशातच तिने काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
दिशा पटानीचा रिव्हिलिंग अंदाज
पहिल्या फोटोमध्ये दिशाने लाल रंगाचा रिव्हिलिंग टॉप परिधान केला आहे. या फोटोत तिने आपले हात बांधले आहेत. मात्र, ही पोस्ट स्लाईड केल्यानंतर दिशाचा दुसरा फोटो पाहायला मिळतो. या फोटोत ती डोक्यावर हात ठेवताना दिसत आहे. तसेच ती आपला टोन्ड फिगर दाखवत आहे. तिचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. (Actress Disha Patani Wears Revealing Dress And Yawns Fans Forget To Blink Bold Photos)
फोटोला मिळाले १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स
काहीच तासात दिशाच्या या फोटोला तब्बल १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच नेटकरी कमेंट्स करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, “पापण्या मिटणेच विसरलो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सौंदर्याची खाण.” याव्यतिरिक्त चाहते फायर इमोजीही कमेंट करत आहेत.
नेहमीच शेअर करते बोल्ड फोटो
दिशा ही फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे. ती आपल्या शरीराची नेहमीच काळजी घेते. ती आपले रूटीन वर्कआऊट करते आणि आपले डायटही फॉलो करते. ती नेहमी बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोंवर चाहत्यांसोबतच कलाकारही स्वत:ला कमेंट्स करण्यापासून रोखू शकत नाहीत. दिशा टायगर श्रॉफसोबत नात्यात असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या आहेत.
दिशाच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर तिने सन २०१६ मध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘कुंग फू योगा’, ‘बाघी २’, ‘भारत’, ‘मलंग’, ‘बाघी ३’ आणि ‘राधे’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा
–अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका
–नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’