फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे नाते हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात छान जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. माध्यमांतील वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, दोघे मार्च २०२२ मध्ये लग्न करणार आहेत. आता दोघांच्या लग्नाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. या अपडेटनुसार फरहान आणि शिबानी मार्चमध्ये लग्न करणार नाहीत. फरहानच्या वाढदिवसाला दोघेही लग्न करण्याचा विचार करत आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, फरहान (Farhan Akhtar) आणि शिबानी (Shibani Dandekar) लवकरच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहेत. फरहान आणि शिबानी ९ जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा करू शकतात. हे जोडपे आनंदाची बातमी जाहीर करण्यासाठी हा खास दिवस निवडू शकतात. कारण हा दिवस फरहान अख्तरचा ४८ वा वाढदिवस आहे. फरहान आणि शिबानी दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांचे रोमँटिक फोटो त्यांच्यातील मजबूत बंध दर्शवतात.
याआधी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मार्च २०२२ मध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी दोघांनीही तयारी सुरू केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या जोडप्याने लग्नासाठी त्यांचा ड्रेस आणि ठिकाणही फायनल केले आहे. मात्र, अद्याप याला जोडप्याकडून दुजोरा मिळालेला नाही आणि कोणतीही प्रतिक्रियाही देण्यात आलेली नाही.
फरहान-शिबानीचे प्रेम आहे जगजाहीर
फरहान आणि शिबानी अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. दोघांचे प्रेम उघड आहे. सोशल मीडियावरही दोघेही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. इतकेच नाही, तर शिबानी आणि फरहान देखील कोणत्याही कार्यक्रमात एकत्र स्पॉट होतात.
फरहान-शिबानीच्या लग्नाला राहणार आहेत कुटुंबीय उपस्थित
माध्यमांतील वृत्तानुसार, हे जोडपे आता त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकून लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी तयार आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नाला खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त इंडस्ट्रीतील त्यांचे जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच शिबानी आणि फरहान त्यांच्या मित्रपरिवारात सात फेरे घेणार आहेत.
हेही वाचा :
राज कुंद्रासोबत पुन्हा दिसली शिल्पा शेट्टी, पतीसोबत पोहोचली साईबाबांच्या दरबारात, पाहा व्हिडिओ