कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जबरदस्त एंट्री केली आहे. अशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढताना दिसत आहे. यामध्ये कलाकारही स्वत:ला रोखू शकलेले नाहीत. नुकतेच अभिनेत्री फातिमा सना शेख कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. यानंतर तिचे चाहते ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
फातिमाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सर्व खबरदारी आणि प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मी घरीच क्वारंटाईन झाले आहे. तुमच्या चिंता आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. सुरक्षित राहा, मित्रांनो.”
फातिमापूर्वी अभिनेता विक्रांत मैसी, आमिर खान, आर माधवन, रणबीर कपूर, परेश रावल, मिलिंद सोमण यांसारखे अनेक दिग्गज कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
फातिमाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या अभिनेता अनिल कपूरसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळाली नाही. ती ‘ल्यूडो’ या चित्रपटातही झळकली होती. यामध्ये राजकुमार रावचीही मुख्य भूमिका होती. याव्यतिरिक्त फातिमा ‘सूरज पे मंगल भारी’ चित्रपटात झळकली होती. चित्रपटात तिच्या विरुद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत होते.
ती आपल्या आगामी ‘अजीब दास्तान’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीझ होणार आहे. चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त जयदीप अहलावतही मुख्य भूमिकेत असणार आहेत. फातिमाला खरी ओळख सन २०१६ साली आलेल्या आमिर खान अभिनित ‘दंगल’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तिने कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारली होती. यापूर्वी तिने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘यक!’, वडील सैफ अली खानचे ‘ते’ डबल मीनिंग गाणे ऐकून साराने दिली होती प्रतिक्रिया
-लाखात एक! भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने केली गरीब मुलांसोबत होळी साजरी, फोटोंनी जिंकले चाहत्यांचे मन
-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल