Saturday, July 6, 2024

लॉकडाऊनमुळे ‘दंगल गर्ल’ फातिमाही झालीये बेरोजगार; सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करताना दिसली अभिनेत्री

मागील एका वर्षापासून कोरोनामुळे देशातील अनेक क्षेत्राचे नुकसान झाले. अर्थव्यवस्था देखील कोलमोडून गेली आहे. लॉकडाऊनचा फटका चित्रपटसृष्टीला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांची शूटिंग बंद झाली आहे. एवढंच काय तर अनेक चित्रपट प्रदर्शित देखील होऊ शकले नाहीत. त्यामुळे चित्रपट सृष्टीचे खूप नुकसान झाले आहे. या काळात कलाकारही बेरोजगार झाले आहेत. कामच बंद असल्याने त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग देखील बंद झाला आहे. अनेक कलाकारांनी तर दुसरे क्षेत्र निवडले आहे. अशामध्ये अनेकांच्या कहाण्या समोर येत आहेत. कोणी बेरोजगार असल्याचे सांगत आहे, तरी कोणी आपल्याकडील सर्व बचत संपल्याचे सांगत आहे.

अशातच बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फातिमा स्वतः सांगत आहे की, तिच्याकडे आता कोणतेही काम नाहीये, ती बेरोजगार आहे. या व्हिडिओमध्ये फातिमा म्हणते की, “जेव्हा कोरोना संपेल तेव्हा सगळ्यांना काम मिळेल. मग तेव्हा मला पण मिळेल. आता तर मी बेरोजगार आहे.” तिचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

फातिमा‌ सनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होता क्षणीच वेगाने व्हायरल झाला आहे. ती एक लोकप्रिय बालकलाकार होती आणि तिने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटातून खूप नाव कमावले आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, “त्या चित्रपट निर्मात्यांना कॉल करायला ती अजिबात संकोच बाळगत नाही, ज्यांच्यासोबत तिला काम करण्याची इच्छा आहे.” कॉल आणि मेसेजद्वारे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तिला कसलीही अडचण वाटत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा