Friday, July 5, 2024

‘आम्ही कमाल केली का?’, म्हणत अभिनेत्री गौहर खानने शेअर केला पतीसोबतचा डान्स व्हिडिओ; एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आपल्या वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद लुटत आहे. यादरम्यान ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इतकेच नाही, तर अनेकवेळा ती आपला पती झैद दरबारसोबत मस्ती करतानाही दिसते. गौहर आणि झैद सुट्टीवर असो किंवा घरी आराम करत असो, ते नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतात. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे गौहर आपले वेगवेगळे अंदाज दाखवत आहे. नुकतेच तिने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे. दोघेही या व्हिडिओमध्ये डान्स करताना पती- पत्नी कमी आणि जीवलग मित्र अधिक दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहते खूप प्रेम व्यक्त करत आहेत.

गौहरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या पतीसोबत ‘बेस्टी’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या दरम्यान जिथे गौहर पांढऱ्या शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे झैद पिवळ्या रंगाच्या टीशर्टसोबत निळ्या रंगाच्या ट्रॅक पँटमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत दोघांची मॅचिंंग स्टेप्स सोशल मीडिया युजर्सला आकर्षित करत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत गौहरने लिहिले आहे की, “माय बेस्टी, आम्ही कमाल केली का? सांगा.” यावर पती झैदने प्रत्युत्तर दिले की, “हे खूपच गोड आहे.” चाहत्यांना गौहर आणि झैदच्या मॅचिंग स्टेप्सव्यतिरिक्त हसताना पडण्याचा अंदाजही खूप आवडला आहे.

खरं तर यापूर्वीही गौहर एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडिओत ती पती झैदच्या पायावर विश्रांती घेताना दिसत होती. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले होते की, “इस्लाममध्ये महिलांची जागा पुरुषाच्या पायांमध्येच आहे.” यावर गौहरने  त्या व्यक्तीला ब्लॉक करत लिहिले होते की, “नाही मूर्खा, इस्लाममध्ये महिला पोलिसांच्या खाली किंवा वर नाही, तर समान असते.”

याव्यतिरिक्त गौहरने आपल्या फोटो आणि व्हिडिओंशिवाय आपल्या बेधडक वक्तव्यासाठीही ओळखली जाते. मागील दिवसात इस्रायल आणि फिलिस्तीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही तिने आपले मत मांडले होते. तिने फिलिस्तानचे समर्थन करत इस्रायलशी संबंधित उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. तिच्या या पोस्टवरही युजर्सने जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या.

हे देखील वाचा