Monday, July 1, 2024

कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

दिवसेंदिवस कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. नाईट कर्फ्यू आणि कलम 144 लागू करूनही, राज्यात 57 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा वेळी नुकताच जुहू बीचचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बीचवर लोकांची गर्दी वाढताना दिसत आहे. या व्हिडिओबद्दल अभिनेत्री गौहर खानने ट्वीट केले असून, लॉकडाऊनची मागणीही केली आहे. गौहर खानने जुहू बीचबाबत केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्याचबरोबर, युजर्स यावर जोरदार प्रतिक्रियाही देत आहेत.

अभिनेत्री गौहर खानने जुहू बीचशी संबंधित हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिले की, “कृपया जुहू बीचवर लॉकडाऊन लावला जाऊ शकतो का.” या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, हजारो लोक समुद्रकिनारी फिरण्यासाठी इथे जमा झाले आहेत. तिथे भेळपुरी वाला, पाणीपुरी व इतर प्रकारची दुकाने दिसत आहेत.

खरं तर हा व्हिडिओ व्हायरल भयानीने त्याच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. याला गौहरने रिट्विट केले. आश्चर्याची बाब म्हणजे, हा व्हिडिओ अशा वेळेचा आहे, जेव्हा कोविड-19ने महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

गौहर खानबद्दल बोलायचे झाले, तर ती गेल्या वर्षी कंटेंट क्रिएटर जैद दरबारसोबत लग्नाच्या बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरलही झाले होते. गौहर खान अखेरच्या वेळेस ‘तांडव’ या वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली होती. तिचे हे पात्र चाहत्यांनीही चांगलेच पसंत केले होते.

त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे आणि येथे सातत्याने प्रकरणे वाढतच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनही लागू करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान सर्व बस देखील बंद ठेवल्या जातील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘संधी मिळेल तिथे डान्स करा!’, केरळच्या मेडिकल स्टुडंट्सनी लावले ‘या’ गाण्यावर ठुमके, पाहा जबरदस्त व्हिडिओ

-एकदम कडक! ‘टॉप टकर’ गाण्यावर थिरकली ‘नॅशनल क्रश’, वाढदिवसानिमित्त व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल

-भारीच ना! करण जोहरने लावले कंगना रणौतच्या ‘या’ गाण्यावर ठुमके, व्हिडिओ रिट्विट करत अभिनेत्री म्हणाली…

हे देखील वाचा