असेे अनेक कलाकार असतात, ज्यांच्याकडे आपण प्रेरणा म्हणून पाहतो. त्यांचे अनुकरण करतो. त्यांच्यासारखेच बनण्याचा प्रयत्न करतो. परंतु यातीलच काही कलाकार अनेकवेळा असे काही करतात, जी त्यांच्याकडून अपेक्षित नसते. असेच काहीसे बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खानबाबत घडले होते. तिने मागील काही दिवसांमध्ये कोरोना व्हायरसच्या नियमांचे उल्लंघन केले होते. यामुळे मुंबई महापालिकेने (बीएमसी) तिच्यावर कारवाई केली होती. यानंतर आता ती कॅमेऱ्यासमोर दिसली आहे. यादरम्यान तिने खबरदारी म्हणून फोटो काढणाऱ्यापूर्वी स्वत:ला सॅनिटाईझ केले आहे. यासोबतच तिने चक्क कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यापूर्वी फोटोग्राफर्सनाही सॅनिटाईझ केले.
खरं तर नुकतेच गौहर जेव्हा आपल्या गाडीच्या जवळ पोहोचली, तेव्हा अनेेक फोटोग्राफर्स तिच्या गाडीच्या जवळ गर्दी करून उभे होते. अशामध्ये पाहायला मिळाले की, अभिनेत्रीने गाडीचे हँडेेल आणि आपली सीट सॅनिटाईझ केली. यानंतर तिने फोटोग्राफर्सनाही सॅनिटायझर दिले आणि आपले हात सॅनिटाईझ करण्यासाठी सांगितलेे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CNCnksmhAWF/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओत गौहरने फिक्कट पिवळ्या रंगाचा सूट घातलेला दिसत आहे. तिने आपला चेहरा मास्कने झाकलेला आहे. यावेळी गौहर म्हणते की, ‘सर्वप्रथम तुम्ही सॅनिटाईझर घ्या, तुम्ही कोठून- कोठून आले असाल.’ सॅनिटाईझर दिल्यानंतर फोटोग्राफर्सना निराश न करता गौहर आपल्या गाडीजवळ मास्क काढून पोझ देते.
खरं तर दोन आठवड्यांपूर्वी गौहरविरोधात बीएमसीने एफआयआर दाखल केली होती. अभिनेत्रीवर आरोप होता की, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करत शूटिंगवर गेली. तरीही, यावर प्रत्युत्तर देत गौहरच्या टीमने म्हटले होते की, ‘ती वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये निगेटिव्ह आढळली आहे.’
यानंतर चित्रपट कामगारांची सर्वात मोठी संस्था फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी (एफडब्ल्यूआयसीई)ने गौहर खानवर दोन महिन्यांसाठी बहिष्कार टाकला. फेडरेशनने अशी चेतावणीही दिली आहे की, जर कोणताही निर्माता याविषयी गौहर खानची मदत केली, तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल. या कारवाईनंतर गौहरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत वाट पाहणे आणि सत्यतेबाबत लिहिले आहे.
गौहर खानने ‘बिग बॉस ७’ सिझनचे विजेतेपद पटकावले होते. याव्यतिरिक्त तिने अनेक वेबसीरिज आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यामध्ये ‘तांडव’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘इश्कजादे’, ‘बेगम जान’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कसा दिसतोय मी?’ आपल्या आगामी चित्रपटातील पहिला लूक शेअर करत ‘खिलाडी’ अक्षयचा चाहत्यांना प्रश्न
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा