चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या चित्रपटात जरी दिसत नसल्या, तरीही त्या सोशल मीडियावर भलत्याच सक्रिय असतात. यामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका गाजवलेला अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचाही समावेश आहे. जिनिलिया अभिनयापासून दूर असली, तरीही ती सोशल मीडियावर अभिनयाचे लहान- लहान व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. तिच्या व्हिडिओंना चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळते. विशेष म्हणजे तिच्यासोबत या व्हिडिओंमध्ये तिचा पती रितेशही तिला साथ देताना दिसतो. अशातच जिनिलियाने पुन्हा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र, या व्हिडिओत रितेश नाही, तर ती आपल्या मुलासोबत दिसत आहे.
जिनिलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जिनिलियासोबत तिचा मुलगाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये जिनिलिया आपल्या मुलाला ओळखण्यास नकार देत म्हणते की, “हाय गाईज… ही मी आहे आणि हा… तू कोण आहे?” (Actress Genelia Deshmukh Forgot His Son While Making Reel Video Watch)
जिनिलियाने हा व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत जिनिलियाने लिहिले आहे की, “जेव्हा तुमच्या मुलाला वाटते की त्याची आई विसरली आहे, पण तरीही खेळ सुरू आहे.”
या व्हिडिओतील या मायलेकांची मस्ती चाहत्यांना भावली आहे. त्यामुळेच तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २८ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्सही मिळाले आहेत. त्याचबरोबर १ हजारपेक्षाही अधिक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, “हा रितेश सरांचा मुलगा आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “बिचारा मुलगा.”
जिनिलियाच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. यानंतर तिने मोजक्याच, पण शानदार चित्रपटात काम केले. ‘जाने तू या जाने ना’ हा चित्रपट तिच्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत सामील आहे. जिनिलिया शेवटची ‘फोर्स २’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-‘तडप’ सिनेमातील पहिले गाणे चाहत्यांच्या भेटीला, पाहायला मिळाली अहान अन् ताराची सिझलिंग केमिस्ट्री
-‘यादों की बारात’ चित्रपटाला ४८ वर्षे पूर्ण, सुपरस्टार राजेश खन्नांना टक्कर द्यायचा ‘हा’ अभिनेता