Friday, July 5, 2024

‘तुला दुसऱ्या डॉक्टरांकडे…’, जिनिलियाच्या प्रश्नावर असं का म्हणाला रितेश? एकटक बघत राहिली अभिनेत्री

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही फिल्म इंडस्ट्रीतील रोमँटिक जोडी अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. दोघेही अनेकदा त्यांचे मजेदार व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसाेबत शेअर करत असतात. त्यांची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. नुकताच जिनिलियाने इंस्टाग्रामवर तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जिनिलिया देशमुख हिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत पती रितेशही दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukhk) यांची कॉमेडी पाहू शकता. व्हिडिओमध्ये जिनिलिया रितेशला म्हणते की, “ऐक, डॉक्टरांनी मला एक महिना आराम करण्यास सांगितले आहे. तू मला कुठे घेऊन जाशील? स्वित्झर्लंड, पॅरिस, लंडन, अमेरिका?” यावर रितेश म्हणतो, “दुसऱ्या डॉक्टरकडे.” हे ऐकून जिनिलियाला धक्का बसताे आणि ती रितेशच्या चेहऱ्याकडे पाहत राहते. हा व्हिडिओ शेअर करताना, अभिनेत्रीने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी याला वेडे म्हणत नाही, मी याला आनंदासाेबत फायदे म्हणते.” या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, ज्यावर सोशल मीडिया युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “माझे आवडते जोडपे.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “तुम्ही दोघे खूप क्यूट आहात.” त्याच वेळी, आणखी एक युजर लिहितो की, “अप्रतिम अभिनय.” जिनिलियाच्या या व्हिडिओवर कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर त्यांचे मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात. चाहतेही त्याच्या नवीन व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात.

जिनिलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे, तर ती एका हिंदी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ‘मिस्टर ममी’ सिनेमाचा समावेश आहे. ती एका नाव निश्चित नसलेल्या कन्नड-तेलुगू चित्रपटाचा देखील भाग आहे. ती तिचा पहिला मराठी चित्रपट ‘वेद’बद्दलदेखील खूप उत्सुक आहे, ज्याचा दिग्दर्शक तिचा पती रितेश आहे.(actress genelia deshmukh shared latest comedy video with riteish deshmukh see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
राखाडी रंगाच्या साडीत सायली संजवीनं वेधले चाहत्यांचे लक्ष
जेव्हा दिग्दर्शकाने वहीदा रहमान यांना सांगितले सापाला किस करायला, ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

हे देखील वाचा