महाराष्ट्र राज्याचे माजी दिग्गज मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील जनतेच्या मनात आपली विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोलाचे योगदान दिले. बुधवारी (२६ मे) विलासराव यांची ७६ वी जयंती आहे. या खास प्रसंगी त्यांची सूनबाई जेनेलिया देशमुख हिने एक भावुक भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्याप्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे.
विलासराव यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त करत लिहिले की, “माझे सर्वात चांगले बाबा, जेव्हाही एक सून आपल्या घरी येते, तेव्हा तिच्या मनात एक भीती असते की, तिच्या सासरचे तिचा स्वीकार करणार नाहीत. तुम्ही मला विश्वास दिला की, कुटुंबाचा अर्थ केवळ रक्ताचे नाते नसते. हे नाते खूप पवित्र आणि आशीर्वादाने भरलेले असते, जे प्रत्येकाच्या आयुष्यात हवे असते. मला तुमचा वारसा त्यामध्ये संयम, तुमची कृतज्ञता, तुमचे सर्वांसाठीचे अपार प्रेम होते, त्या सर्वांचा भाग बनायचे आहे.”
जेनेलियाने पुढे सांगितले की, तिला आपल्या आयुष्यात त्या अनोळखी व्यक्तींचाही आशीर्वाद मिळाला, ज्यांच्या आयुष्याला विलासराव देशमुख यांनी स्पर्श केला. तिने लिहिले की, “मला केवळ माझ्या सासऱ्यांनी मीठीच मारली नाही, तर एक वडील म्हणून प्रेमही दिले. मी पाहू शकते की, माझ्या वडिलांना विश्वास आहे, त्यांनी आपल्या मुलीला सर्वात चांगल्या कुटुंबात पाठवले आहे. बाबा तुम्ही असे महान व्यक्ती आहात, ज्याबद्दल मला वाटते की, ते तुम्हाला माहिती नाही. मी प्रत्येक दिवशी त्या अनोळखी व्यक्तींकडून ऐकते आणि आशीर्वाद घेते, ज्यांच्या आयुष्याला तुम्ही स्पर्श केला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. आम्हाला तुमची खूप आठवण येत आहे.”
Happy Birthday Pappa
We miss you ????????????
A Father- Daughter hug that will last forever pic.twitter.com/xGOKpu12Jf
— Genelia Deshmukh (@geneliad) May 26, 2021
जेनेलियाने ट्विटरवरही एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने विलासराव देशमुख यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. आम्ही तुमची आठवण काढतो. बाप-लेकीची मीठी चिरंजीवी राहील.”
जेनेलियाव्यतिरिक्त पती आणि अभिनेता रितेश देशमुखनेही आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “तुमची आठवण काढणे सोपे आहे, जी मी रोज काढतो. तुमची आठवण काढणे हे कधीकधी खूप वेदनादायक असते, जे कधीच जात नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुमची सदैव आठवण येते.”
यापूर्वी रितेशने एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यामध्ये व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘अभी मुझ में कहीं बाकी थोडीसी है जिंदगी’ हे गाणं वाजत आहे. तसेच व्हिडिओत विलासराव यांचा फोटोही दिसत आहे. रितेशने ही पोस्ट शेअर करत ‘तुमची दररोज आठवण येते’ असे लिहिले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…