बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि रोमँटिक जोडींपैकी एक म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. या दोघांचे एकमेकांवरील प्रेम आपल्याला त्यांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमधून दिसते. परंतु जेनेलियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रितेश अभिनेत्री प्रीति झिंटाची गळाभेट घेतो आणि तिच्या हाताला किस करतो. यानंतर जेनेलिया त्याचे जे हाल करते, ते पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
जेनेलियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेशील व्हिडिओ शेअर केला आहे. तिने दोन व्हिडिओ एकत्र जोडले आहेत. यामध्ये दिसत आहे की, आयफा पुरस्कारादरम्यान रितेश प्रीतिची गळाभेट घेतो आणि तिच्या हातावर किस करतो. यादरम्यान शेजारीच उभी असलेली जेनेलिया हे सर्व पाहते आणि एक फेक स्माईलही देते. यानंतर दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये जेनेलिया रितेशची चांगलीच धुलाई करताना दिसत आहे. सोबतच तोही आपल्या पत्नीसमोर हात जोडताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तेरा नाम लिया, तुझे याद किया…’ हे गाणेही वाजताना दिसत आहे.
नुकतेच जेनेलियाने रितेशसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यामध्ये रितेश आपल्या पत्नीचा हेअर स्टायलिस्ट बनला होता. खरं तर जेेनेलियाच्या हाताला प्लॅस्टर झाल्यामुळे पती रितेश तिचे केस विंचारत होता.
खरं तर जेनेलिया आणि रितेशसोबत ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. यादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर रितेश आणि जेनेलियाने सन २०१२ मध्ये लग्न केले. दोघांनाही दोन मुले आहेत. त्यांची नावे रियान आणि राहिल असे आहे. नुकतेच या जोडप्याने आपल्या लग्नाचा ९वा वाढदिवसही साजरा केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड
-सपना चौधरीला टक्कर देत, हरियाणवी गायिका रेणुका पंवार घेऊन आली नवं गाणं! पाहा व्हिडिओ