Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड रितेश अन् जिनिलियाची जोडी पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा; चाहत्यांची उत्सुकता पोहचली शिगेला

रितेश अन् जिनिलियाची जोडी पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा; चाहत्यांची उत्सुकता पोहचली शिगेला

जिनिलिया डिसूझा आणि रितेश देशमुख हे जोडपं बॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयासह प्रेम कहानीमुळे देखील नेहमी चर्चेत असतं. या दोघांनी सिनेसृष्टीमध्ये त्यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने खूप नाव कमावले आहे. चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहणे खूप आवडते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती ते आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशात त्यांचे चाहते खूप दिवसांपासून या दोघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे जिनिलियाने सांगितले.

नुकतेच रितेश आणि जिनिलिया ‘सुपर डांसर ४’ मध्ये झळकले होते. ते दोघे परीक्षक पाहुणे म्हणून तेथे आले होते. या सेटवर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणी बद्दल सर्वांना सांगितले. ते दोघे एकमेकांना कसे भेटले, नंतर घरच्यांना लग्नासाठी कसे मनवले या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. शोमध्ये आल्यानंतर सेटवरील वातावरण अगदी रोमँटिक झालं होतं. दोघांनी या शोमध्ये खूप एन्जॉय केला.

या शोमध्ये जिनिलिया विचारण्यात आले होते की तुम्ही दोघे एकत्र चित्रपटांमध्ये पुन्हा कधी झळकणार? यावर उत्तर देत जिनिलिया म्हणाली होती की, “मला स्वतःला रितेश बरोबर चित्रपट करायचा आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत कदाचित तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आम्ही दोघेही एका चांगल्या कहानीच्या प्रतिक्षेत आहोत.”

अभिनेत्रीच्या या उत्तराने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. रितेश आणि जिनिलियाने साल २०१२ मध्ये विवाह केला. हे दोघांनी साल २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोघेही या चित्रपटामध्येच एकमेकांना पहिल्यांदा भेटले आणि प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी ‘मस्ती’ आणि  ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात एकत्र काम केले. दोघेही त्यांच्या संसारात खूप सुखी आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी

-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य

हे देखील वाचा