बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जॉर्जिया अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत असते, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडतो. जॉर्जियाच्या फोटोंवर चाहते देखील भरभरून प्रेमाचा वर्षाव करतात. अलीकडेच जॉर्जियाने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा लूक पाहण्यासारखा आहे. जॉर्जियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे.
नुकतेच जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या फोटोत तिने जांभळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिच्या गोऱ्या रंगावर जांभळा रंग अगदी खुलून दिसत आहे. त्यासह तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि हलकासा मेकअप करून तिने तिचा बोल्ड लूक पूर्ण केला आहे. त्यासह तिने तिच्या कानाच्या वर लावलेले चाफ्याचे फूल लक्ष वेधून घेत आहेत.
जॉर्जिया समुद्राच्या किनाऱ्यावर बसून फोटोसाठी पोझ देत आहे. एका फोटोत तिने तिचे दोन्ही हात तिच्या मांडीवर ठेवले असून, ती समोर पाहत आहे, तर दुसऱ्या फोटोत देखील ती बसलेलीच दिसत आहेत. ज्यात ती समुद्राकडे पाहत डोक्याला हात लावताना दिसत आहे. जॉर्जियाने शेअर केलेल्या या फोटोतील लूकला चाहते पसंती देत आहेत. तिच्या या लूकमधील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंना २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यासह चाहेते फायर इमोजी शेअर करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जॉर्जिया एंड्रियानीने ‘कॅरोलिन कामाक्षी’ या वेबसीरिजद्वारे दक्षिणेत तिच्या अभिनयाची सुरुवात केली. ती शहनाझ गिलचा भाऊ शाहबाझ बदेशासोबत ‘लिटिल स्टार’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. जॉर्जिया लवकरच श्रेयस तळपदेसोबत ‘वेलकम टू बजरंगपुर’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा
-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे
-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका