Saturday, July 6, 2024

हेमा मालिनी यांनी केला धर्मेंद्र यांच्यासोबत फोटो शेअर, नेटकऱ्यांनी म्हटले ‘रब ने बना दी जोडी’

बॉलिवूडमध्ये नाते काचेचे असतात असे आपण अनेकदा ऐकतो. खूपच तकलादू आणि खोटे असतात. मात्र या गोष्टीला अनेक अपवाद याच क्षेत्रात आपल्याला दिसतील. याच क्षेत्रात अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी आनंदाने आणि यशस्वी पद्धतीने त्यांचे नाते निभावले आहे. याच जोड्यांमधील एक जोडी म्हणजे ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि हीमॅन धर्मेंद्र यांची. त्यांच्या लग्नाला जवळपास ४० वर्ष झाली आहे, आणि आजही ते अतिशय आनंदाने त्यांच्या संसार करत आहे. त्यांना एक आदर्श जोडपे म्हणून देखील ओळखले जाते.

नुकताच हेमाजींनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण जगभरातून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा आल्या. आज हेमाजींनी त्यांचा आणि धर्मेंद्र यांचा एक सुंदर फोटो शेअर करून सर्वांना धन्यवाद म्हटले आहे. या फोटोमध्ये दोघेही खूपच खुश दिसत असून, हेमाजी यांनी निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालत त्यावर मोकळे केस सोडले आहे, तर धर्मेंद्र यांनी हिरव्या रंगाचा शर्ट घालत त्यांनी हेमाजींच्या खांद्यावर हात ठेवत पोज दिली आहे.

हा फोटो शेअर करत हेमाजी यांनी लिहिले की, खरंच खूप खूप धन्यवाद, ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संदेश पाठवले. तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या एवढ्या प्रेमामुळे आणि आदरामुळे मी खरंच भारावून गेली आहे. खूप धन्यवाद.” त्यांची ही पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. या फोटोवर एकाने लिहिले की, “तुम्हा दोघांना खूप प्रेम.” अजून एकाने लिहिले की, “रब ने बना दी जोडी”. याशिवाय अनेकांनी या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ अभिनेत्याच्या वडिलांनी संपवले होते स्वत:चेच कुटुंब, पत्नी अन् मुलीला गोळी मारून केली आत्महत्या

-घटस्फोटानंतर पुरुषांपेक्षा जास्त त्रास महिलांना होतो, म्हणत ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दुःख

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

हे देखील वाचा