सदाबहार अभिनय आणि चिरतरुण व्यक्तिमत्त्वाने हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण केलेले सुपरस्टार अभिनेते म्हणजे ‘देव आनंद.’ यांना आजही चॉकलेट अभिनेता म्हणून ओळखले जाते. अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून ते कलर चित्रपटांपर्यंत त्यांनी त्यांच्या मोठ्या सिनेप्रवासात असंख्य हिट सिनेमे दिले. त्यांची लोकप्रियता तुफान होती. मुली तर त्यांच्यामागे वेड्या होत्या. त्या काळातील प्रत्येक अभिनेत्रीची त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असायची. अशीच इच्छा ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची देखील होती.
‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटाच्या निमित्ताने हेमाजींची ही इच्छा हे स्वप्न पूर्ण होणार होते. त्यांना या सिनेमात देव आनंद यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. मात्र एकीकडे त्यांना हा सिनेमा आणि देव आनंद यांच्यासोबत कमी करण्याची संधी तर मिळाली पण त्या खूप नर्व्हस देखील होत्या. हेमा मालिनी जेव्हा देव आनंद यांच्यासोबत काम करत होत्या तेव्हा ते सुपरस्टार होते. देव आनंद यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.
हेमा मालिनी यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, “माझी आई देव आनंद यांची मोठी फॅन होती. मी तर त्यांचे नाव ऐकत आणि त्यांचे सिनेमे बघतच मोठी झाली. तेव्हा मला माहित नव्हते की, एक दिवस मी त्यांच्यासोबतच चित्रपट करेल. मी माझ्या करियरची सुरुवात राज कपूर यांच्यासोबत केली. जेव्हा मला ‘जॉनी मेरा नाम’ सिनेमा मिळाला तेव्हा मी लगेच होकार दिला, पण तुम्ही माझ्या नर्वसनेसचा अंदाज देखील लावू शकत नाही. मी तर इंडस्ट्रीमध्ये नवीन होते आणि ते सुपरस्टार होते. पण त्यांनी कधीच मी नसून असल्याचे मला जाणवू दिले नाही. देव साहेब आणि त्यांचे भाऊ विजय यांनी माझी खूप काळजी घेतली. आम्ही बिहारमध्ये ‘वादा तो निभाया’ गाण्याची शूटिंग करत होतो तेव्हा तिथे तुफान गर्दी झाली. त्यावेळी देव साहेबांनी माझ्यावर खास लक्ष दिले होते.”
पुढे त्या म्हणाल्या, ” ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटाच्या नावावरून निर्माते गुलशन राय आणि राज कपूर यांच्यामध्ये खूप वाद झाला. कारण त्यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमाच्या नावाशी साधर्म्य असलेले आमच्या सिनेमाचे नाव होते. ११ नोव्हेंबर 1970 साली आमचा ‘जॉनी मेरा नाम’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि बरोबर एक महिन्याने १८ डिसेंबर १९७० ला ‘‘मेरा नाम जोकर’ चित्रपट प्रदर्शित झाला. आमचा सिनेमा तर सुपरहिट झाला, पण राज कपूर यांच्या सिनेमाला अपेक्षित यश मिळाले नाही. ‘जॉनी मेरा नाम’ सिनेमा क्लासिक चित्रपटांच्या यादीत गणला जातो.”‘जॉनी मेरा नाम’ हा सिनेमा हिट तर झाला, सोबतच या सिनेमातील गाणी देखील तुफान गाजली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही नक्की वाचा-
मुलीचं चित्रपटात काम करणं सुपरस्टार धर्मेंद्रला खटकलं, ६ महिने बोलणंच केलं होतं बंद
बापरे! हेमा मालिनी व जितेंद्र यांचं लग्न होणारचं होतं, पण तेवढ्यात दारु पिऊन तिथं धर्मेंद्र पोहचले