Thursday, April 24, 2025
Home मराठी ‘महिन्यातून एकदातरी नवऱ्याचे कपडे ढापायचं…’, म्हणत हेमांगी कवीने पतीचे कपडे घालून दिल्या हटके पोझ

‘महिन्यातून एकदातरी नवऱ्याचे कपडे ढापायचं…’, म्हणत हेमांगी कवीने पतीचे कपडे घालून दिल्या हटके पोझ

आपल्या बिनधास्त वागण्यामुळे अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिच्या वाढत्या वावरामुळे तिच्या फॉलोवर्सची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती तिचे अनके फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. मागील काही दिवसांपूर्वी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेमांगीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने टी-शर्ट आणि शॉर्ट जीन्स घातली आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहेत. ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूप डॅशिंग दिसत आहे. (actress hemangi kavi share a photos with wearing her husband’s cloths)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “महिन्यातून एकदा तरी नवऱ्याचे कपडे ढापायचं हे ठरलंय आपलं.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. अनेकांना तिचा हा अंदाज खूप आवडला आहे. त्यामुळे तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. या आधी देखील तिने तिच्या नवऱ्याचे कपडे घालून फोटो शेअर केले होते. त्यावेळी देखील तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोला भरभरून प्रतिसाद दिला होता. मागील काही दिवसांपूर्वी हेमांगीचे ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ हे प्रकरण खूप गाजले होते. यानंतर ती खूप चर्चेत आली होती. यावर अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचेच झाल्यास तिने, ‘बंदिशाळा’, ‘पिपाणी’, ‘धुडगूस’, ‘डावपेच’, ‘मनातल्या मनात’, ‘पारध’, ‘भूतकाळ’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘गोळाबेरीज’, ‘कोण आहे रे तिकडे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबत तिने ‘तेरी लाडली मै’ आणि ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांमध्ये काम करून तिचे नाव कमावले आहे. सध्या ती चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण

-‘ही पाहा ऍटिट्यूडवाली आंटी…’, करीनाचे उद्धट वागणे पाहून नेटकऱ्यांची सुनावले तिला चांगलेच खडेबोल

हे देखील वाचा