Monday, June 9, 2025
Home मराठी नव्या वर्षात चर्चेचा पहिला मान हेमांगीला, मोनोकनीतील फोटो-व्हिडिओचा सोशल मीडियावर धुरळा

नव्या वर्षात चर्चेचा पहिला मान हेमांगीला, मोनोकनीतील फोटो-व्हिडिओचा सोशल मीडियावर धुरळा

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) आपल्या बिनधास्त आणि धडाकेबाज अंदाजासाठी ओळखली जाते. तिचा सोशल मीडियावर देखील प्रचंड वावर असतो. अभिनेत्री सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. त्याचबरोबर आता नवीन वर्षाचे सर्वच कलाकार मोठ्या जोमाने स्वागत करताना दिसले आहेत. अनेकांनी कुठे ना कुठे जाऊन नवीन वर्ष साजरे करून आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकतेच आता हेमांगीने देखील तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे.

हेमांगीने तिचे हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यात तिने लाल रंगाची सुंदर अशी मोनोकनी परिधान केलेली दिसत आहे. तिने शेअर केलेला फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. ती कॅमेरासमोर फोटोसाठी सुंदर अशी पोझ देत आहे. तिचे मोकळे केस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर तिच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तिच्या या फोटोंना १२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यासह चाहते तिच्या या फोटोवर कमेंट करून थकत नाहीयेत.

यासह हेमांगीने व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात ती स्विमिंग पूलच्याकडेने चालताना दिसत आहे. तिच्या पाठीमागे धबधब्यासारखे सुंदर असे दृश्य दिसत आहे. ती अतिशय आनंदात दिसत असून, बॅकग्राऊंडला ‘पहला नशा’ हे गाणे वाजता आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन देखील दिले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले की, “२०२२ ची सुरुवात.” तिचा लाल रंगातील मोनोकनीतील ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडिओला २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेमांगीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ फोटोंचा आहे. तिचे विविध पोझमधील फोटो या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला ३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘बंदिशाळा’, ‘पिपाणी’, ‘धुडगूस’ ‘डाव पेच’, ‘मनातल्या मनात’, ‘पारध’, ‘भूतकाळ’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा