Monday, July 1, 2024

लुटावं तरी किती? एक-दाेन हजार नव्हे, तर हिनाने बुटासाठी ‘एवढी’ माेठी मागितली रक्कम

टीव्हीची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिने अलीकडेच तिचा मॅनेजर कौशल जोशी याच्या लग्नाला हजेरी लावली होती. यादरम्यान तिने खूप धमाल केली. या लग्नात हिनाशिवाय टीव्ही जगतातील अनेक स्टार्सही सहभागी झाले होते. सगळ्यांनी खूप मजा केली. तसेच, लग्नात बुट चोरण्याचा समारंभ सर्वात धुमधडाक्यात करण्यात आला. नवरदेव आपल्या मेहुण्यांना शगुन म्हणून पैसे देतो. या लग्नातही तेच झालं. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हिना खानने तिच्या मॅनेजरकडे एक-दोन हजार नव्हे, तर लाखो रुपयांची मागणी केली होती. किती आहे ती रक्कम? चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये हिना खान (hina khan) मॅनेजर कौशल जोशी (kaushal joshi) आणि त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. हिनाने यावेळी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. साडीवर बॅकलेस ब्लाउज, गळ्यात जड दागिने आणि कानात लहान झुमके यात हिना प्रचंड सुंदर दिसत आहे.

हिनासह अनेक कलाकार लग्नामध्ये उपस्थित हाेते. यावेळी सर्व कलाकारांनी खूप मजा केली. लग्ना साेहळ्यादरम्यान बुट लपवण्याची वेळ आली. यावेळी नेहमीप्रमाणे मुलीनी बाजी मारली. तर झाले असे की, हिनाने तिचा मॅनेजर काैशल जाेशी याच्याकडे 1 लाख 11 हजार रुपयांची मागणी केली. यावर काैशलनेही त्यांची मागणी पुर्ण करण्याचे वचन दिले आणि 1 लाख 11 हजार देणार असल्याचे सांगितले. काैशलने हिना आणि इतर लोकांचे म्हणणे ऐकून त्यांना 75 हजार दिले आणि उर्वरित 25 हजार नंतर देणार असल्याचे सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. लोक हिना आणि तिच्या मॅनेजरच्या बाँडिंगचे प्रचंड कौतुक करत आहेत. भारती सिंग, अली गोनी, जस्मिन भसीन, रुपाली गांगुली, अवनीत कौर यांच्यासह अनेक टीव्ही स्टार्स या लग्नात उपस्थित हाेते. (actress hina khan manager kaushal joshi wedding actress demand lakh rupees for juta churai function)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बेशरम रंग’वर ‘बबिता जी’ने हद्दच केली पार; चाहते म्हणाले, ‘आंटी चित्रपट फ्लॉप…’

अक्षय कुमारला रडताना पाहून भावूक झाला सलमान, पोस्ट शेअर करत ‘खिलाडी’चे केले सांत्वन

हे देखील वाचा