Sunday, January 26, 2025
Home बॉलीवूड थेट न्यूयॉर्कमधून अभिनेत्री हिना खानने केले २०२२चे स्वागत; लूक असा की, चाहतेही होतायत घायाळ

थेट न्यूयॉर्कमधून अभिनेत्री हिना खानने केले २०२२चे स्वागत; लूक असा की, चाहतेही होतायत घायाळ

तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर ती एकापेक्षा एक सुंदर पोझ देत फोटो काढताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हिनाचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडताना दिसतोय. तिचा हा लूक प्रत्येक चाहत्याचे मन जिंकत आहे. हिना या लूकमध्ये मोहक आणि आकर्षक दिसत आहे.

हिनाने काही तासांपूर्वीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक लाईक मिळाले आहेत. इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या ट्रेंडिंगवर आहे. हिनाचे इंस्टाग्रामवर १५.८ मिलियन चाहते आहेत.

हिनाच्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी मालिकेपासून झाली. स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिला खूप ओळख मिळाली. या मालिकेत ती ‘अक्षरा’ हे पात्र निभावत होती. त्यानंतर तिने ‘कसोटी जिंदगी की’मध्ये ‘कोमॉलिका’ ही व्यक्तीरेखा साकारली.

त्याचबरोबर ‘फियर फॅक्टर- खतरों के खिलाडी ८’, ‘बिग बॉस ११’ या रियॅलिटी शोमध्ये ती रनरअप आली. त्यानंतर तिने काही पंजाबी म्युझिक अल्बममध्येही काम केले. विशेष म्हणजे हिनाने छोट्या पडद्यासोबतच रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची कमाल दाखवलीय. ती २०२० साली आलेल्या ‘हॅक्ड’ या सिनेमात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत रोहन शाह आणि सिड मक्कर यांच्याही भूमिका होत्या.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा