Sunday, June 1, 2025
Home बॉलीवूड कॅन्सरशी लढा देताना रॅम्प वॉकसाठी आली हिना खान; हसतमुख चेहऱ्यासह दिसली अतिशय सुंदर…

कॅन्सरशी लढा देताना रॅम्प वॉकसाठी आली हिना खान; हसतमुख चेहऱ्यासह दिसली अतिशय सुंदर…

अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहे. अभिनेत्री स्टेज 3 मध्ये असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या आजाराशी धैर्याने लढताना हिना कमी पडली नाही. ती अलीकडेच डिझायनर मनीष मल्होत्राच्या इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. यावेळी हिना खानने चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन पूर्ण उर्जेने रॅम्पवर वॉक केले. मनीष मल्होत्राचा हा शो साहस, सेवा आणि वारसा साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात अभिनेत्री हिनाने फिकट गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता. या सूटमधील तपशील सोनेरी रंगात केले होते. हिना खाननेही या रॅम्प वॉक शोबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने लिहिले की, या शोमध्ये सहभागी होण्यासाठी ती खूप उत्साहित आहे. हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या शोचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती मनीष मल्होत्रासोबत हसतमुख पोज देताना दिसत आहे. या पोस्टवर हिनाने लिहिले आहे- काल रात्री बद्दल…बॅकस्टेज…धन्यवाद मनीष…मला अजूनच मजबूत वाटले. रॅम्प वॉक दरम्यान हिनाच्या चेहऱ्यावर हास्य आहे, ती आनंदी आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे.

याआधी एका इव्हेंटमध्ये हिना वधूच्या रुपात लाल रंगाचा ड्रेस घालून रॅम्प वॉक करताना दिसली होती. यावेळी हिना खूपच सुंदर दिसत होती. कॅन्सरशी लढा देत असूनही हिना आपल्या कामात मागे नाही. वधूच्या रुपात रॅम्प वॉक करताना हिना खूपच सुंदर दिसत होती, तिचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हिना आज 2 ऑक्टोबरला तिचा वाढदिवसही साजरा करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा बनली आई; दिला गोंडस मुलीला जन्म…

हे देखील वाचा