Monday, July 1, 2024

ओहो…सुंदर सुंदर! हिना खानने नेसली तब्बल ‘इतक्या’ हजारांची साडी; ब्लाऊजची रंगलीय भलतीच चर्चा

कलाकार आपल्या चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून कलाकार आपले फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्या दररोजच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना फार आवडते. अनेक चाहते त्यांच्या आवडीच्या कलाकाराला फॉलो करत असतात. त्यांच्या आवडीचे अभिनेता व अभिनेत्री ज्या पद्धतीने आयुष्य जगतात तसंच आपणही जगावं असं त्यांना वाटत असतं. अशात स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून एक आदर्श सून म्हणून घराघरात पोहोचलेल्या हिना खानने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत.

तिच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. सर्वत्र हिनाच्या नव्या लूकचीच चर्चा सुरू आहे. हिनाने आपले फोटो शेअर केले असून यामध्ये तिने काळी व रंगीबेरंगी साडी परिधान केली आहे. तिच्या या लूकमध्ये विशेष करून तिच्या ब्लाऊजची चांगलीच चर्चा सुरू आहे. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की, हिनाने यामध्ये बंद गळ्याचा ब्लाऊज परिधान केला आहे. हेवी मेकपमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. तिने यामध्ये मेसी हेअर स्टाईल केली असून कानामध्ये मोठे व गोल आकाराचे दागिने व हातामध्ये एक अंगठी घातली आहे. (Actress Hina Khan Wore A Vintage Saree Which Costs Rupees 49000)

अनेक महिलांची तिच्या या लूकला  मोठी पसंती मिळत आहे. जर तुम्हाला हिना सारखी साडी हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला ४९,५०० एवढे पैसे मोजावे लागतील. तिच्या काळ्या साडीवर असलेली लाल रंगाची फुलं या साडीला अधिकच आकर्षक बनवत आहेत. हिनाच्या या लूकमध्ये दागिन्यांची जास्त आरास दिसत नाही. फक्त उठाव मेकअपने हिनाच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत.

अनेक मालिकेत काम करून हिना घराघरात पोहचली. त्यानंतर ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ यांमधून हिनाने आपला वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर आणला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?

-सलमान, करण जोहर नंतर आता बिग बॉसमध्ये होणार एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री?, ‘ही’ मोठी जबाबदारी त्या सांभाळणार

-करीनाने सीताच्या भूमिकेसाठी खरंच मागितले होते १२ कोटी? मौन सोडत पहिल्यांदाच अभिनेत्रीने दिली यावर प्रतिक्रिया

हे देखील वाचा