झी युवा या वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेला अख्ख्या महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतले होते. या मालिकेने विशेषतः तरुण वर्गाला भुरळ घातली होती. यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळेला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. मालिकेत वैदेही आणि मानसची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. ऋता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच ऋताचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.
ऋताने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋताने फिकट गुलाबी रंगाचा एक सुंदर असा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये तिने जास्त कोणताही मेकअप केला नाही. तरी देखील ती खूपच सुंदर दिसत आहे. एका फोटोमध्ये ती हातात पणती घेऊन पोझ देताना दिसत आहे. (Actress hruta durgule share her beautiful photo on social media)
तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “जगातील सर्वात सुंदर मुलगी .” तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आपकी तारीफ मे क्या कहे आप हमारी जान बन गये.” अशाप्रकारे या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
ऋता ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांमध्ये फॉलोवर्स आहेत. तिने या आधी ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले आहे. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर
–आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स