झी युवा या वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेला आख्ख्या महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतले होते. या मालिकेने विशेषतः तरुण वर्गाला भुरळ घातली होती. यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. तसेच मालिकेत वैदेही आणि मानसची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली. ऋता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच ऋताचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.
ऋताने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने सुंदर असा लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने डायमंड नेकलेस, डायमंड ईअरिंग आणि डायमंड ब्रेसलेट घातले आहे. ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress hruta durgule share her beautiful red dress photos on social media)
ऋताचा हा लूक झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर “प्रिन्सेस” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.
ऋता ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांमध्ये फॉलोव्हर्स आहेत. तिने या आधी ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले आहे. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?
-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’
-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे