Saturday, August 2, 2025
Home मराठी हृता दुर्गुळेच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? प्रतिकच्या मिठीत सुखी दिसतंय ‘फुलपाखरू’

हृता दुर्गुळेच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? प्रतिकच्या मिठीत सुखी दिसतंय ‘फुलपाखरू’

मराठी मनोरंजनविश्वात एक ‘फुलपाखरू’ आले आणि त्याने सर्वांचीच मने जिंकली. आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते तुमच्या लक्षात आलेच असेल. आम्ही बोलतोय अभिनेत्री हृता दुर्गुळेबद्दल. हृताने खूपच कमी वेळात तिचे मोठे प्रस्थ या क्षेत्रात निर्माण केले आहे. नाजूक, सालस, निरागस, आकर्षक चेहरा असलेल्या हृताने तिचे मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोविंग तयार केली. आज हृता तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. मालिका, नाटक दोन्ही क्षेत्रात ती यशस्वी होत असलेल्या हृताने ती नात्यात असल्याचे जाहीर केले होते. अनेक तरुणांची क्रश असलेल्या हृताने खास पोस्ट शेअर करत ती रिलेशनमध्ये असल्याचे जाहीर केले. हृता दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत रिलेशनमध्ये असल्याचे सांगत त्याच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्यानंतर २४ डिसेंबर २०२१ रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तिने साखरपुडा देखील केला.

सुरुवातीला त्यांचा साखरपुडा खूपच गुप्त स्वरूपाचा होता मात्र नंतर त्यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या साखरपुड्याची फोटो, व्हिडिओ आणि त्या दोघांचा डान्स सोशल मीडियावर तुफान गाजले. अतिशय मोठ्या स्वरुपात व्हायरल झालेल्या या फोटोंवर त्यांच्या फॅशनने देखील भरभरून कमेंट्स करत दोघांचे अभिनंदन केले होते. नुकतेच हृताने त्यांच्या साखरपुड्याचे काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सर्व रोमँटिक फोटोंमध्ये ते खूपच गोड आणि मेड फॉर इच अदर दिसत आहे. साखरपुड्याच्या वेळी केलेल्या फोटोशूटमधील हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत. हृता आणि प्रतीक ही नवीन जोडी फॅन्सला देखील खूपच आवडत आहे.

अभिनेत्री हृता दुर्गळेने ‘दुर्वा’ मालिकेतून मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले. मात्र तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे. ही मालिका तरुणांमध्ये खूपच गाजली होती. ‘फुलपाखरू’ मालिकेनंतर हृताने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकातून नाट्यविश्वात पदार्पण केले. तिचे हे नाटक खूप गाजले किंबहुना अजूनही गाजत आहे. सध्या हृता ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत दीपूची भूमिका साकारत आहे.

हृताचा बॉयफ्रेंड प्रतीक हा एक दिग्दर्शक असून, त्याने अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. यात ‘बेहद २’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदडी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. आता फॅन्सला त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा