भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने एंट्री घेतली आहे. याचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज लाखो लोकांना कोरोना व्हायरसची लागण होत आहे, तर हजारो लोक जगाचा निरोप घेत आहेत. अशामध्ये मोठ्या मनाने बॉलिवूड कलाकार कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून येत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा समावेश आहे. तिने ग्लोबल चाईल्ड राइट्स ऑर्गनायझेशन ‘सेव्ह द चिल्ड्रन’सोबत हात मिळवला आहे.
या संस्थेसोबत मिळून हुमाने दिल्लीत तात्पुरते रुग्णालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या रुग्णालयात १०० बेड आणि एक ऑक्सिजन प्लांटही असेल. या प्रोजेक्टमध्ये घरात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय किट्सही दिल्या जाणार आहेत. यामध्ये डॉक्टरांचा सल्ला आणि सायको सोशल थेरपिस्ट यांचा समावेश आहे जेणेकरुन रुग्ण पूर्णपणे बरे होतील.
हुमा कुरेशीव्यतिरिक्त यामध्ये ‘आर्मी ऑफ द डेड’ या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक जॅक स्नायडर यांचाही समावेश आहे. सोबतच ब्रिटिश अभिनेता आणि रॅपर रिझवान अहमद (रिझ) देखील यामध्ये हुमाचा साथ देत आहे.
अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून लोकांना दान देण्याचे आवाहन केले आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत तिने म्हटले की, “तुम्हा सर्वांप्रमाणे या व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने मीदेखील दु:खी आणि घाबरलेली आहे. आता ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे. मी सेव्ह द चिल्ड्रनसोबत हात मिळवला आहे.”
I’ve joined hands with @stc_india help Delhi fight the pandemic.
We are working to build a temporary hospital facility in Delhi, that will have a 100 beds along with an oxygen plant. Please support us ❤️???????? #BreathofLife https://t.co/5RuMP0u0NG pic.twitter.com/bgRuOgfGKq— Huma S Qureshi (@humasqureshi) May 10, 2021
हुमाने पुढे म्हटले, “तुम्हा सर्वांना माहिती आहे की, दिल्लीमध्ये वैद्यकीय यंत्रणेवर खूपच ताण पडत आहे. आपल्या राजधानीला मदतीची गरज आहे. मागील काही आठवड्यांमध्ये मी सेव्ह द चिल्ड्रनसोबत मिळून एक खास प्रोजेक्टवर काम करत आहे. आम्ही शहरात १०० बेडची एक कोव्हिड सुविधा बनवण्याची योजना आखत आहोत. या आपात्कालीन वैद्यकीय सुविधेमध्ये अनुभवी वैद्यकीय प्रोफेशनल्स, औषधे आणि ऑक्सिजन प्लांटही असेल. जे रुग्ण घरी आहेत, त्यांना कोव्हिड केअर किटसोबत टेलिकन्सल्टेशन आणि इतर गोष्टीही दिल्या जातील. मी आणि माझ्या पूर्ण कुटुंबाने दान केले आहे, परंतदु आम्हाला तुमची आवश्यकता आहे. प्रत्येकाची मदत एक जीव वाचवेल आणि कोणतेही दान छोटे नाहीये. त्यामुळे कृपया मी तुम्हाला आमची आणि एकमेकांची मदत करण्याचे आवाहन करते.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…