Friday, October 17, 2025
Home मराठी ‘प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर…’, म्हणत ईशा केसकरने व्यक्त केली सिनेमाला प्राईम टाईम न मिळाल्याची खंत

‘प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर…’, म्हणत ईशा केसकरने व्यक्त केली सिनेमाला प्राईम टाईम न मिळाल्याची खंत

जेव्हा एकाच दिवशी अनेक सिनेमे प्रदर्शित होतात तेव्हा चित्रपटगृहांमध्ये देखील कोणत्या सिनेमाला किती शो द्यायचे याचे गणित बसवले जाते. अशातच जर एखादा मोठा सिनेमा असेल आणि त्याला जास्त गर्दी होत असेल तर अनेक चित्रपटगृहांमध्ये त्या शोला जास्त शो आणि मुख्य असणारा प्राईम शो दिला जातो. त्यामुळे इतर चित्रपटांना त्याचे मोठे नुकसान होते. असेच काहीसे होत आहे मराठी सिनेमा असलेल्या ‘सरला एक कोटी’सोबत. सिनेमाला प्राईम टाईम मिळत नसल्यामुळे सिनेमाच्या कलाकारांमध्ये आणि टीममध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबदल नुकतेच अभिनेत्री ईशा केसकरने तिचे मत मांडले आहे.

‘सरला एक कोटी’ मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा केसकरने इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून या गोष्टीवर भाष्य केले आहे. ती म्हणाली, “आज राज्यात बऱ्याच ठिकाणी आमच्या चित्रपटाला स्क्रिन्सच मिळत नाही. आम्ही चित्रपट प्रदर्शनाची घाई केली. त्यामुळे आम्हाला अनेक ठिकाणी शो खूप कमी मिळाले. आम्हाला जो वेळ मिळाला त्यावेळेत आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू असे आम्हाला वाटत होते मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. एका हाताने कधीच टाळी वाजत नाही. नक्कीच आम्हालाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात उशीर झाला. आम्ही प्रेक्षकापर्यंत पाहिजे तेवढे पोहोचू शकलो नाही. आणि त्यांना पटवून देऊ शकलो नाही. ‘वेड’ या मराठी चित्रपटासाठी ज्या प्रकारे प्रमोशन करण्यात आले तेवढे आम्हाला करता आले नाही. म्हणूनचा आम्हाला स्क्रीन दिल्या गेलेल्या नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

पुढे ईशा म्हणाली, “मात्र जर प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला तर नक्कीच अजून स्क्रीन मिळाव्यात यासाठी मी स्वत: प्रयत्न करेल. अनेक शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि याला किमान दोन तरी शो मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या चित्रपटासोबत इतर अनेक चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे मोठी स्पर्धा आहे. तरीही आमचे निर्माते आणि दिग्दर्शक खूप प्रयत्न करत आहेत.”

तत्पूर्वी ईशासोबत या सिनेमात ओंकार भोजने मुख्य भूमिकेत असून, “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखवर भाईजान भारी? ‘पठाण’मध्ये सलमानच्या एन्ट्री चित्रपटगृहांमध्ये एकच कल्ला, व्हिडिओ झाले व्हायरल

बापरे! तब्बल 72 कोटींची संपत्ती संजू बाबाच्या नावावर करत चाहतीने घेतला अखेरचा श्वास…

हे देखील वाचा