टेलिव्हिजनवर कलाकार जी भूमिका निभावतात, तिच भूमिका आयुष्यभरासाठी त्यांच्या नावी होऊन जाते. मग ती नायकाची भूमिका असो किंवा खलनायकाची. प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. पण एका नायकाच्या भूमिकेतून थेट खलनायकाच्या भूमिकेत कलाकारांना स्वीकारण्यास प्रेक्षक काचकूच करतात. पण काही कलाकार असे असतात, जे प्रत्येक भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावतात.
याला साजेसे असे उदाहरण म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर. झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत बानूचे पात्र निभावून तिने प्रेक्षकांच्या मनात तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. पण त्यानंतर तिने काही दिवस ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया हे पात्र निभावले होते. पण या ग्लॅमरस भूमिकेत देखील प्रेक्षकांनी तिला खूप लवकर स्वीकारले होते. ईशा तिच्या खऱ्या आयुष्यात देखील ग्लॅमरस आहे. नुकतेच गुरुवारी (११ नोव्हेंबर) ईशाने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्त अनेकांनी सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच ईशाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सगळ्यांचे आभार मानले आहे. (Actress isha keskar share her photo and give thanks to people who blessed her on birthday)
ईशाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ईशाने सुंदर असा निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने नेटचा लेहंगा घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर पोझ देताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देऊन तुम्ही माझ्यावर प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केला आहे. माझा दिवस एवढा छान बनवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद” तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री सायली संजीव हिने या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत.
ईशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास , तिने ‘गर्लफ्रेंड’, या चित्रपटात काम केले आहे. यासोबत तिने ‘सीआरडी’ आणि ‘याला जीवन ऐसे नाव’ यामध्ये काम केले आहे. अभिनेता ऋषी सक्सेना आणि ईशा मागील अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऋषीने या आधी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. या मालिकेत त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत सायली संजीव होती. या मालिकेतील त्यांची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…










