Monday, July 8, 2024

दृश्यम फेम इशिता दत्ताने केले ग्लॅमरस फोटोशूट, लूक पाहून नेटकरी झाले घायाळ

अभिनेत्री इशिता दत्ता टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या इशिताने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘दृश्यम २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमावला. या सान्म्त अजय देवगण, तब्बू आदी कलाकार असूनही इशिताने तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष तर वेधले सोबतच तिची छाप देखील सोडली. सिनेमात अतिशय साधी दिसणारी इशिता तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र चांगलीच ग्लॅमरस आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, ते चांगलेच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

इशिता दत्ताने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे फोटोसहित केले आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय स्टनिंग, ग्लॅमरस आणि सुंदर दिसत असून तिचा हा लूक चांगलाच गाजत आहे. या ड्रेसमध्ये तिने विविध पोज देत फोटो काढलेले दिसत असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडत आहे. इशिताने या ड्रेसवर केस मोकळे सोडत, न्यूड मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती अधिकच खुलून आल्याचे तिचे फॅन्स तिला कमेंट्स करून सांगत आहे. ‘दृश्यम’ सिनेमात आपल्या सोज्ज्वळतेने प्रेक्षकांचे मनं जिंकणाऱ्या इशिताने खऱ्या आयुष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बोल्ड आणि बिनधास्त फोटोनी नेटकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. इंडियन, वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये ती तिचा जलवा दाखवत आहे.

इशिताबद्दल सांगायचे झाल्यास इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण असून ती मूळची जमशेदपूरची आहे. मुंबईला आल्यावर इशिताने फिल्म इस्न्टिट्यूटमदेह प्रवेश घेतला. काही वर्ष ती सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्यानंतर २०१२ साली तिने तेलगू सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. पुढे ती ‘बेपनाह प्यार’ आदी अनेक मालिकांमध्ये झळकली. हिंदी चित्रपटांमध्ये देखील इशिताने काम केले. २०१७ साली तिने अभिनेता वत्सल सेठसोबत लग्न केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा