Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड ‘मनिके मागे हिते’ गाण्याची गायिका योहानीसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने लगावले जोरदार ठुमके

‘मनिके मागे हिते’ गाण्याची गायिका योहानीसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने लगावले जोरदार ठुमके

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जॅकलिन बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत फोटोशूट शेअर करत असते.

जॅकलिनने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती सध्याच्या एका प्रसिद्ध गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे. मात्र, तिचा हा व्हिडिओ आजवरच्या अनेक व्हिडिओंपैकी विशेष खास आहे. याचे कारण जॅकलिनने हा व्हिडिओ ‘मनिके मागे हिते’ या प्रसिद्ध गीताच्या मुळ श्रीलंकन गायिकेसोबत शूट केला आहे. ज्यात ती स्वतः ​​गायिका योहानी सोबत ठुमके लगावताना दिसत आहे. या दोघींचा हा सुंदर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

‘अलादीन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसचे नावही गेल्या काही दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे खूप चर्चेत आहे. ईडी सतत तिच्या संपर्कात असून तिची चौकशीही सुरू आहे. जॅकलिनच्या प्रवक्त्याने असेही सांगितले होते की, जॅकलिनने या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींसोबतच्या संबंधांवर दिलेले वक्तव्यही फेटाळले आहे.

हे संपूर्ण प्रकरण सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे. ज्यांच्यावर २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने काही काळापूर्वी सुकेश चंद्रशेखरच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. ज्यामध्ये चेन्नईतील समुद्रकिनाऱ्याजवळील एका आलिशान बंगल्यातून ८२.५ लाख रोख, दोन किलो सोने, १६ आलिशान कार आणि आणखी महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही, तर सुकेश रोहिणी सध्या तुरुंगात असून ८ ऑगस्ट रोजी त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने व्यावसायिकाकडून ५० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती.

जॅकलिनच्या सध्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जॅकलिन लवकरच ‘किक २’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘भूत पोलिस’ आणि रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि ‘बच्चन पांडे’मध्ये दिसणार आहे. इतकंच नाही, तर जॅकलिन लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्येही तिच्या टॅलेंटची मोहोर उमटवणार आहे.

हे देखील वाचा