Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड कोरोना काळात तंदुरुस्त राहायचं असेल, तर जॅकलिन फर्नांडिसने सांगितलेली ‘ही’ गोष्ट कराच

कोरोना काळात तंदुरुस्त राहायचं असेल, तर जॅकलिन फर्नांडिसने सांगितलेली ‘ही’ गोष्ट कराच

जगभरातील सर्वात भयानक व्हायरसपैकी एक असलेल्या कोरोना व्हायरसने आपल्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड्सच्या कमतरतेमुळे रुग्णाचे नातेवाईक खूपच चिंतेत पडले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व यंत्रणा खिळखिळी करून टाकली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या व्हायरसचा परिणाम व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. अशामध्ये आपली काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी घरीच योगा आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारही या परिस्थितीत जनतेला आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत आहेत.

कलाकार सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सांगत आहेत की, आपल्या घरीच स्वत: ला फिट आणि तंदुरुस्त कसे ठेवू शकता. नुकतेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिनेही एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ती प्राणायाम करताना दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, “प्राणायाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”

प्राणायाम करण्याचे फायदे
द जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह एँड कॉम्पिलमेंट्री मेडिसिनच्या अभ्यासात म्हटले गेले आहे की, कोव्हिड- १९ च्या उपचारादरम्यान योगा आणि प्राणायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

प्राणायाम केल्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते. कोरोना व्हायरसदरम्यान श्वसनाचा व्यायाम करणे फुफ्फुसासाठी खूपच फायदेशीर आहे. सोबतच शरीराच्या इतर भागातही रक्तप्रवाह चांगल्याप्रकारे होतो.

प्राणायाम एक दीर्घ श्वासोच्छवास व्यायाम आहे, जो शरीराला मनाशी जोडण्याचे काम करतो. असे केल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. प्राणायाम केल्याने तणाव कमी होतो, ज्यामुळे झोपेमध्ये सुधारणा होतेे आणि मेंदू सक्रियपणे कार्य करतो. तसेच रक्तदाब कमी होतो.

भस्त्रिका प्राणायाम करण्याची पद्धत
भस्त्रिका प्राणायाम करण्यासाठी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सुखासन लावून बसा. यानंतर, दोन्ही हात ध्यान मुद्रेत पायांवर ठेवा. सुरुवातीला हळू श्वास घ्या आणि दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. रोज १५ मिनिटांसाठी हे आसन करा. हे आसन केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. जर तुम्हाला हलका श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हा आसन दररोज करा.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खतरनाक! ‘या’ चित्रपटाच्या सेटवर डॉबरमन जातीच्या कुत्र्याने घेतला होता अर्जुन कपूरच्या पायाचा चावा, अभिनेत्याने शेअर केला किस्सा

-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांसाठी दिला खास संदेश

-‘इंडियन आयडल १२’ शोमध्ये वडिलांविना दिसणार सायली कांबळे, कारण सांगताच झाले सर्वजण भावुक

हे देखील वाचा