प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. तिची आई किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, किम यांच्यासोबत ही घटना घडल्यानंतर त्यांना लगेच वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे जॅकलिनचे आई-वडील हे बहरिन येथे असतात, तर जॅकलिन ही मुंबईत असते. अशामध्ये जॅकलिनसाठी हा खूपच कठीण काळ आहे.
खरं तर, मनी लाँड्रिंग केसमुळे जॅकलिन (Jacqueline Fernandez) विमान प्रवास करू शकत नाही. तिला विशेष परवानगी घ्यावी लागेल. मागील वर्षी ख्रिसमस साजरा करण्यासाठी ती आपल्या आई-वडिलांकडे चालली होती. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे तिला विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले होते.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनला देशातच राहण्यास सांगितले आहे. कारण, तिला तपासात सहभागी व्हावे लागू शकते. अभिनेत्रीविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामुळे तिच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. जॅकलिनने ईडीला नोटीस काढून टाकण्याची विनंती केली होती. त्यावर ईडीने अभिनेत्रीचा अर्ज फेटाळून लावला. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला आईकडे जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.
यापूर्वी ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि त्याची अभिनेत्री पत्नी लीना मारिया पॉल यांच्याविरुद्ध २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात जॅकलिनची चौकशी केली होती. चंद्रशेखरने अभिनेत्रीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला १० कोटींहून अधिक किमतीच्या महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. महागड्या भेटवस्तूंमध्ये दागिने, हिरे जडवलेल्या दागिन्यांचा सेट, क्रॉकरी, चार पर्शियन मांजरी (सुमारे ९ लाख रुपये किमतीची एक मांजर) आणि ५२ लाख रुपयांचा घोडा यांचा समावेश होता. सुकेशने जॅकलिनच्या भावंडांनाही मोठी रक्कम पाठवली होती. ईडीने जॅकलिनचे जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.
चंद्रशेखरवर फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांसारख्या काही मोठ्या लोकांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे.
हेही वाचा-